पुढचं आइस्क्रीम लाहौरमध्ये खाऊ…! रजा रद्द झाल्यानंतर कर्तव्यावर जाताना सैनिकाचे शब्द ऐकून तुम्हीही व्हाल स्तब्ध, पाहा व्हिडिओ
esakal May 09, 2025 08:45 AM

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानविरुद्ध सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, शत्रू देश संतापला आहे. आपल्या भ्याड कृत्यांपासून थांबत नाही. ८ मे रोजी संध्याकाळी पाकिस्तानने जम्मूसह देशातील अनेक भागात हल्ला केला, ज्याला भारतीय सैन्याने योग्य उत्तर दिले. तणावाच्या या गंभीर परिस्थितीमुळे पंजाब आणि राजस्थानसह भारतातील अनेक राज्यांमध्ये सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशातच एका जवानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारताने जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमध्ये पाकिस्तानकडून केलेले क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले उधळून लावले. यानंतर, भारतानेही प्रत्युत्तर दिले आणि लाहोर आणि कराचीसह अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले. भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीने, पाकिस्तानने पुन्हा एकदा खोटे बोलण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान घाबरला आहे आणि आज त्यांनी भारतावर अयशस्वी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ज्याला भारतीय सैन्याने योग्य उत्तर देत त्यांचे सर्व ड्रोन हवेतच नष्ट केले आहेत.

या काळात अनेक भारतीय जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. अशाच एका जवानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यातून त्याची देशभक्ती दिसत आहे. रजा रद्द झाल्यानंतर पुन्हा कर्तव्यावर जाताना म्हणाला की, मी परत येईन याची कोणतीही हमी नाही. पण भारताला काहीही होणार नाही याची पूर्ण हमी आहे. माझ्या शूर सैनिकांनो, संपूर्ण देशाला पूर्ण विश्वास आहे की ते पाकिस्तानला हरवून परत येतील. पुढचं आइस्क्रीम लाहौरमध्ये खाऊ, असं तो म्हणाला आहे. त्याच्या या देशप्रेमाचे सर्व कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तर दुसरीकडे पाकिस्तानच्या अयशस्वी हल्ल्यांना भारतीय लष्कर शेजारील देशाला योग्य उत्तर देत आहे. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचा ड्रोन हवेतच पाडला. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. अनेक शहरांमध्ये वीज खंडित झाल्याच्या बातम्या देखील येत आहेत. भारतीय सैन्य नियंत्रण रेषेवर पूर्ण अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे आणि पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला कोणताही विलंब न करता प्रत्युत्तर देत आहे.

पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यासाठी भारताने आपल्या सर्व संरक्षण यंत्रणा सक्रिय केल्या आहेत. रशियाकडून मिळालेल्या एस-४०० संरक्षण प्रणाली पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करत आहेत. भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले अल्पावधीतच हाणून पाडले आहेत. पाकिस्तानला लागून असलेल्या सर्व सीमेवर सैन्य पूर्णपणे सतर्क आहे आणि शत्रू देशाच्या प्रत्येक कृतीला योग्य उत्तर देत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.