MG Windsor Pro EV लॉन्च, नेक्सॉन, क्रेटा ईव्हीला टक्कर देणार? जाणून घ्या
GH News May 09, 2025 06:10 PM

तुम्हाला कार खरेदी करायची आहे का? टाटा नेक्सॉन ईव्ही, ह्युंदाई क्रेटा ईव्हीला टक्कर देणारी कार बाजारात आली आहे. सिंगल चार्जमध्ये 449 किलोमीटरची रेंज मिळेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेली एडिशन सिंगल चार्जमध्ये 332 किमीची रेंज देते. विशेष म्हणजे ट्रॅफिक जॅम असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग आणि अ‍ॅडेप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स मिळणार आहेत. ही कार तीन नव्या रंगांमध्ये येणार आहे. अरोरा सिल्व्हर, ग्लेझ रेड आणि सेलाडॉन ब्लू असे हे रंग आहेत.

इलेक्ट्रिक कारच्या दुनियेत एक गाडी नवीन दिमाखात आली आहे. टाटा नेक्सॉन ईव्ही आणि ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकला टक्कर देणारी एमजी विंडसर प्रो ईव्ही मंगळवारी लाँच करण्यात आली. ही कार वाढीव रेंजसह येते आणि सिंगल चार्जमध्ये 449 किमीपर्यंतचे अंतर पार करते. याची सुरुवातीची किंमत फक्त 12.50 लाख रुपये आहे. याचे बुकिंग 8 मेपासून सुरू होत आहे.

एमजी विंडसर प्रो फिक्स्ड बॅटरी आणि रेंटल बॅटरीपर्यायांसह येईल. जर ग्राहकांनी फिक्स्ड बॅटरीने खरेदी केली तर त्यांना ही कार 17.79 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत मिळेल. तर भाड्यासाठी प्रति किलोमीटर साडेचार रुपये मोजावे लागतात. ही कारची सुरुवातीची किंमत आहे, ज्याचा फायदा 8,000 ग्राहकांना होणार आहे. कारची ही किंमत ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक आणि टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्सच्या आसपास आहे.

52.9 किलोवॅट बॅटरी

एमजी विंडसर प्रो ईव्हीमध्ये 52.9 किलोवॅट बॅटरी पॅक मिळेल. सिंगल चार्जमध्ये 449 किलोमीटरची रेंज मिळेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेली सोपी एडिशन सिंगल चार्जमध्ये 332 किमीची रेंज देते.

सुरक्षितता आणि आराम

या कारला कंपनीकडून लेव्हल-2 एडीएएस देखील देण्यात आला आहे. यामुळे कारची ऑटोमेशन क्षमता आणि सुरक्षितता वाढते. याशिवाय ट्रॅफिक जॅम असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग आणि अ‍ॅडेप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स मिळणार आहेत.

या कारसोबत तुम्ही दुसरी इलेक्ट्रिक कार आणि इतर इलेक्ट्रिक डिव्हाइसही चालवू शकता. ही कार तीन नव्या रंगांमध्ये येणार आहे. अरोरा सिल्व्हर, ग्लेझ रेड आणि सेलाडॉन ब्लू असे हे रंग आहेत.

एमजी विंडसर ही देशातील सर्वात वेगाने वाढणारी इलेक्ट्रिक कार आहे. याचे साधे व्हर्जन सुमारे 8 महिन्यांनी लाँच करण्यात आले होते. 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची ही कार कंपनीने या कारसोबत ‘बॅटरी एज अ सर्व्हिस’ (रेंटल बॅटरी) हा पर्याय सादर केला, ज्यामुळे ही कार अनेक महिने देशातील नंबर-1 इलेक्ट्रिक कार राहिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.