नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेतील कारवाईचा तपशील देशवासीयांना देणाऱ्या लष्करातील अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांची प्रशंसा सर्वोच्च न्यायालयानेही केलेली आहे. महिलांना लष्करात कायम नियुक्ती देताना न्यायालयाने कर्नल कुरेशी यांचे उदाहरण देत त्यांचे कौतुक केले होते.
भारतीय लष्करातील महिला अधिकाऱ्यांना कायम नियुक्ती देण्याबाबतच्या एका खटल्यात (संरक्षण मंत्रालय विरुद्ध बबिता पुनिया आणि अन्य) सर्वोच्च न्यायालयाने १७ फेब्रुवारी २०२० रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. लष्करात वरिष्ठ पदे वगळता अन्य सर्व पदांपासून महिलांना वंचित ठेवणे समर्थनीय नाही. लष्करात महिलांना स्थायी नियुक्ती करण्यास परवानगी देताना न्यायालयाने महिला अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा उल्लेख करीत कर्नल कुरेशी यांच्या कामगिरीचे उदाहरण दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते, की ‘एक्सरसाईज फोर्स १८’ या बहुराष्ट्रीय सैन्य सरावात भारतीय लष्कराचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. हा सराव भारतातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा परदेशी लष्करी सराव आहे. कुरेशी यांनी २००६ मध्ये काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतही त्यांनी काम केले आहे. त्या देशांमध्ये युद्धबंदीचे निरीक्षण करण्याची आणि मानवतावादी कार्यात मदत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. संघर्षग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्याकडे लक्ष देणे हेही त्यांचे काम होते.
ठळक घडामोडीपंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घातल्या
विमानाचे तिकीट काढलेल्या लष्करी जवानांना प्रवासाचे नियोजन बदलायचे असल्यास किंवा तिकीट रद्द करायचे असल्यास कोणतेही शुल्क आकारणार नसल्याची एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची घोषणा
कोलकत्यातील एडन गार्डन आणि जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमला बाँबहल्ल्याची धमकी
पाकिस्तानच्या गोळीबारामुळे विस्थापित झालेल्या सीमेवरील नागरिकांना जम्मूतील सर्व मशिदींचे दरवाजे खुले
अमृतसरमधील एका गावात क्षेपणास्त्राचे तुकडे सापडल्याचा स्थानिकांचा दावा
बांगलादेशपासून दीड किलोमीटरवर असलेल्या आगारताळा विमानतळाने अतिरिक्त सुरक्षा मागितली