India-Pakistan war : ‘ना’पाक हरकती आणि भारताचे सडेतोड प्रत्युत्तर.. 25 पॉईंट्समध्ये घ्या समजून
GH News May 09, 2025 12:08 PM

पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने केवळ तो हल्ला हाणून पाडला नाही तर पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर योग्य उत्तरही दिले. भारतीय सैन्याने जम्मूच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी कारवाई पूर्णपणे हाणून पाडली आहे आणि कराचीपर्यंत चोख प्रत्युत्तर दिलं. हे भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात निर्णायक आणि अचूक लष्करी प्रतिसादांपैकी एक आहे. भारताने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला हाणून पाडला, एवढंच नव्हे तर पाकला पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तरही दिले आहे.

8 आणि 9 मे च्या रात्री, पाकिस्तानने जम्मू विमानतळ (सतवारी), सांबा, आरएस पुरा आणि अर्निया सारख्या भागांना लक्ष्य करून किमान 8 क्षेपणास्त्रे आणि अनेक ड्रोन डागले. परंतु भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने, विशेषतः एस-400 ‘सुदर्शन चक्र’ ने हवेतच सर्व हल्ले हाणून पाडले. पाकिस्तानने हमासच्या धर्तीवर स्वस्त रॉकेट तंत्रज्ञानाचा वापर केला, परंतु भारताच्या अचूक आणि आधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेने वेळीच या सर्व धोक्यांना निष्प्रभ केले.

पठाणकोट एअरबेसवरील हल्लाही अयशस्वी

पाकड्यांनी पठाणकोट एअरबेसलाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथेही सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे आणि तांत्रिक यंत्रणेमुळे हा हल्ला उधळून लावण्यात आला. भारतीय संरक्षण यंत्रणेच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. राजौरी आणि नौशेरा सेक्टरमध्येही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याच्या युद्धबंदीला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. प्रत्युत्तरादाखल, भारताने कराची बंदराला लक्ष्य केले, जिथे अनेक शक्तिशाली स्फोट झाले. या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठे लॉजिस्टिक आणि सामरिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. भारतीय नौदलाने लक्ष्य अचूकपणे लक्ष्य करून ही कारवाई केली.

25 पॉईंट्समध्ये समजून घ्या पाकच्या नापाक हरकती आणि भारताचा तूफानी प्रतिसाद

  1. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचे नापाक डाव पूर्णपणे हाणून पाडले आहेत.
  2. 8 आणि 9 मे च्या रात्री पाकिस्तानने जम्मूच्या सीमावर्ती भागात ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
  3. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने सतर्कता दाखवली आणि पाकिस्तानने हवेत डागलेल्या किमान 8 क्षेपणास्त्रांना उद्ध्वस्त केले.
  4. जम्मू विमानतळ (सतवारी), सांबा, आरएस पुरा आणि अर्निया हे भाग पाकिस्तानी ड्रोनचे लक्ष्य होते.
  5. पाकिस्तानने हमास या दहशतवादी संघटनेच्या धर्तीवर स्वस्त रॉकेट तंत्रज्ञानाचा वापर केला.
  6. भारतीय सैन्याने वेळीच धोका ओळखला आणि लक्ष्य गाठण्यापूर्वीच क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली.
  7. भारताच्या एस-400 ‘सुदर्शन चक्र’ हवाई संरक्षण यंत्रणेने क्षेपणास्त्र आणि ड्रोन दोन्ही हवेत नष्ट करून आपली क्षमता दाखवून दिली आहे.
  8. पठाणकोट एअरबेसवर हल्ला करण्याचा पाकिस्तानने अयशस्वी प्रयत्नही केला होता, जो पूर्णपणे हाणून पाडण्यात आला.
  9. भारतीय संरक्षण यंत्रणेच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
  10. राजौरी आणि नौशेरा सेक्टरमध्येही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, भारताने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.
  11. संपूर्ण नियंत्रण रेषेवर (एलओसी) हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
  12. आकाशात फ्लेयर्स आणि ड्रोनच्या हालचालींमुळे जम्मू शहरात रात्रभर गोंधळ उडाला.
  13. हल्ल्यांनंतर, भारताने प्रत्युत्तर दिले आणि कराची बंदराला लक्ष्य केले.
  14. कराची बंदरावर अनेक मोठे स्फोट झाले, ज्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जाते.
  15. भारतीय नौदलाने केलेल्या या ऑपरेशनचे वर्णन अतिशय अचूक आणि लक्ष्यित असे केले जात आहे.
  16. भारताने लाहोर, इस्लामाबाद, बहावलपूर, सियालकोट आणि पीओकेमधील कोटली येथेही कारवाई केली.
  17. पाकिस्तानकडून होणाऱ्या चिथावणीखोर कारवाया आणि भारताकडून होणाऱ्या प्रत्युत्तरादरम्यान दिल्लीत मोठ्या बैठका झाल्या.
  18. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली.
  19. तर दुसरीकडे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली आणि तयारीची माहिती घेतली.
  20. या बैठकीत सीमेवरील परिस्थिती, दहशतवादी कारवाया आणि लष्कराच्या तयारीचा आढावा घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
  21. परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली.
  22. दहशतवादाविरुद्ध अमेरिकेच्या पाठिंब्याचे भारताने कौतुक केले आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
  23. भारताचा प्रतिसाद संतुलित पण अचूक आहे. तणाव वाढवण्याच्या प्रत्येक प्रयत्नाला भारत योग्य उत्तर देईल, असे जयशंकर म्हणाले.
  24. दुसरीकडे, इंडिगो, अकासा इत्यादी विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी सुरक्षा सल्लागार जारी केल्या आहेत.
  25. प्रवाशांनी विमानतळावर वेळेच्या बरेच आधी पोहोचावे आणि विमान मार्गांमध्ये संभाव्य बदलांसाठी सतर्क राहावे, असे यात म्हटले आहे.

भारताने पाकिस्तानी लढाऊ विमान पाडले

पठाणकोट सेक्टरमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले आहे. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाकिस्तानी लढाऊ विमानाने भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, जो भारतीय हवाई दलाने वेळीच ओळखला आणि तो पाडला. या कारवाईत पठाणकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी विमानाचे अवशेष सापडले. पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, परंतु भारतीय संरक्षण मंत्रालयाने हे पाकिस्तानचे चिथावणीखोर कृत्य असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यानंतर भारताने संपूर्ण नियंत्रण रेषेवर (एलओसी) हाय अलर्ट जाहीर केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.