रेखा झुनझुनवालांना घरबसल्या मिळणार 3 कोटी रुपये, गुंतवणूक कंपनी देणार मोठा लाभांश
ET Marathi May 09, 2025 12:45 PM
मुंबई : दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांना आता 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम घरबसल्या मिळणार आहे. त्यांना त्यांच्या गुंतवणूक कंपनीकडून प्रति शेअर 8 रुपयांचा मोठा लाभ मिळेल. रेखा झुनझुनवाला दिग्गज दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची पत्नी आहे.शेअर बाजारातील अनेक कंपन्यांनी तिमाही निकालांसह आपल्या भागधारकांसाठी लाभांशही जाहीर केला आहे. यामध्ये क्रेडिट रेटिंग देणारी प्रसिद्ध कंपनी क्रिसिल लिमिटेडचा समावेश आहे. क्रिसिल लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना वित्तीय वर्ष 2025 साठी एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने प्रत्येक शेअरवर 800% लाभांश अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. म्हणजे गुंतवणूकदारांना प्रति शेअर 8 रुपये लाभांश मिळेल. क्रिसिलने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, संचालक मंडळाने 31 मार्च 2025 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक इक्विटी शेअरवर 8 रुपयांच्या अंतरिम लाभांशाची शिफारस केली आहे.क्रिसिल म्हणाले की 19 मे 2025 रोजी पात्र भागधारकांना प्रति शेअर 8 रुपये लाभांश देण्यात येईल. डिव्हिडंड पेमेंटसाठी एक्स-डेट 7 मे 2025 रोजी अंतिम करण्यात आली. क्रिसिल लिमिटेड 1987 मध्ये सुरू झाली. कंपनी ही भारतात क्रेडिट रेटिंग सेवा प्रदान करणारी पहिली कंपनी होती.ट्रेडलाइनच्या आकडेवारीनुसार, रेखा झुनझुनवाला क्रिसिलमध्ये एक मोठे गुंतवणूकदार आहेत. मार्च 2024 तिमाहीच्या अखेरीस झुनझुनवालांचा कंपनीत 5.2 टक्के हिस्सा आहे. रेखा झुनझुनवालांकडे 3,799,000 शेअर्स आहेत. सध्याचे होल्डिंग मूल्य 1,843.4 कोटी रुपये आहे. रेखा झुनझुनवालांना क्रिसिलकडून 03,799,000 रुपये लाभांश मिळेल.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.