भारत पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण स्थिती आहे. पाकिस्तानला दहशतवाद्यांच्या बराच पुळका आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध पुकारलं आहे. 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला होता. या प्रत्युत्तर म्हणून भारताने जसाच तसं उत्तर देऊ असं सांगितलं होतं. भारताने रणनितीनुसार 15 दिवसांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने भारतावर भ्याड हल्ले करण्यास सुरुवात केली. भारताने प्रत्येक हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं. असं असताना भारतीय सैन्यदलाचं मनोबल वाढवण्याचं काम प्रत्येक नागरिक करत आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू याने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे संतापाची लाट उसळळी आहे. अंबाती रायुडूने ही पोस्ट जेव्हा पाकिस्तान भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले करत होता तेव्हा केली. त्यामुळे अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कारण भारतीय सैन्य नागरी वस्त्यांवर होणारे हल्ले परतवून लावण्यास जीवाची बाजी लावत होते.
अंबाती रायुडूने एक्सवर पोस्ट करताना लिहिलं की, “डोळ्याच्या बदल्यात डोळा घेतल्याने संपूर्ण जग आंधळे होते.” या पोस्टमुळे अनेकांचा संताप झाला आहे. एका युजर्सने तर या पोस्टला उत्तर देत हे डिलिट करण्यास सांगतलं आहे. दुसऱ्या युजर्सने लिहिलं की, आपण असा विचार करू तेव्हा आपण दोन्ही डोळे गमावलेले असतील. वाद वाढत असल्याचं पाहून अंबाती रायुडूने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
अंबाती रायुडूने दुसरी पोस्ट करत लिहिलं की, जम्मू काश्मीर, पंजाब आणि भारतीय सीमेच्या इतर भागात सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि शांततेसाठी प्रार्थना.प्रभावित झालेल्या प्रत्येकासाठी सुरक्षितता, ताकद आणि जलद निराकरणाची आशा आहे. जय हिंद.’
भारत आतापर्यंत फक्त प्रत्येक हल्ल्याचं प्रत्युत्तर देत आहे. ही लढाई दहशतवादाविरोधात असल्याचं भारताने अनेक देशांना पटवून सांगितलं आहे. पण पाकिस्तानला दहशतवादाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे दहशतवादा खतपाणी घालण्यासाठी अशी कृत्य करत आहे.