मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आजपासून म्हणजेच ९ मे पासून मेट्रो ३चा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. आजपासून बीकेसी ते आचार्य अत्रे चौकपर्यंत मेट्रो मार्ग सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईकर लवकरात लवकर आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचू शकणार आहेत.
आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर मुख्यमंत्री स्वतः बीकेसी ते सिद्धिविनायक स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवास करणार आहेत. त्यामुळे उद्यापासून प्रवासी मेट्रो ३ ने प्रवास करु शकणार आहेत.
मेट्रो ३चा दुसरा टप्पा आज सुरु (BKC Phase 3 Open today )
मेट्रो ३ चा पहिला टप्पा काही दिवसांपूर्वी सुरु झाला होता. त्यानंतर आता दुसरा टप्पा सुरु झाल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर होणार आहे. गेल्या ३-४ दिवसांपासून सीएमआरएस पथकाने या मार्गाची तपासणी केली आहे. यानंतर आयुक्तांकडून प्रमाणपत्र मिळाले. आयुक्तांकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता लगेचच मेट्रो ३ चा दुसरा टप्पा सुरु केला जाणार आहे. सध्या आरे ते बीकेसी हा मार्ग सुरु आहे. या मार्गात एकूण ११ आहेत. यानंतर आता मेट्रो ३चा दुसरा टप्पादेखील सुरु होणार आहे.
मेट्रो ३चा दुसरा टप्प्यातील तिकीट (BKC Phase 3 Ticket Fare)
३ च्या दुसऱ्या टप्प्यातील प्रवासासाठी तिकीटदेखील फार कमी आहे. तुम्हाला फक्त १० ते ५० रुपयांपर्यंत तिकीट मिळणार आहे.तुम्हाला आता आरे ते आचार्य अत्रे चौकापर्यंत फक्त ३६ मिनिटांत पोहचता येणार आहे. यासाठी तुम्हाला ६० रुपये मोजावे लागणार आहे. २२ किमी अंतर तुम्ही फक्त ३६ मिनिटांत पार करु शकणार आहात. धारावी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत ६ अंडरग्राउंड स्थानके आहेत.