Operation Sindoor : कर्नाटकातील मशिदींमध्ये आज मुस्लिम बांधवांकडून करण्यात येणार नमाज पठण, काय आहे कारण?
esakal May 09, 2025 02:45 PM

बंगळूर : लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे (Operation Sindoor) सर्वत्र कौतुक होत आहे. या संदर्भात देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज (ता. ९) कर्नाटकातील सर्व प्रार्थनास्थळांमध्ये विशेष नमाज पठण केली जाईल, असे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री बी. झेड. जमीर अहमद यांनी सांगितले.

मंत्री म्हणाले, प्रार्थनास्थळांना निर्देश दिले आहेत की, आज, शुक्रवारी सर्व (Muslim Community) मशिदींमध्ये एकत्र येऊन भारतीय सैनिकांबद्दल कृतज्ञता, धैर्य आणि पाठिंबा व्यक्त करण्यासाठी विशेष प्रार्थना करावी. अलीकडेच, पाकिस्तानविरुद्ध युद्ध झाल्यास मी आत्मघातकी सूट घालण्यास तयार असल्याचे वक्तव्य केल्यावरून मंत्री जमीर अहमद यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.

'जैश'चे 10 ते 12 दहशतवादी ठार; BSF जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर

भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्री दहशतवाद्यांच्या एका गटाने सांबा येथे आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सतर्क असलेल्या बीएसएफ (सीमा सुरक्षा दल) जवानांनी जैश-ए-मोहम्मद संघटनेचे 10 ते 12 दहशतवादी ठार केल्याचं कळतं आहे.

पहिली चिथावणी पाकिस्तानकडूनच, परराष्ट्र मंत्रालयाने केले स्पष्ट

‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारताची दहशतवाद्यांविरुद्धची संयमित, नियंत्रित आणि तणाव टाळणारी कारवाई असून पाकिस्तानने यापुढे कोणतीही चिथावणीखोर कृती केल्यास ती संघर्ष वाढवणारी ठरेल, असा सज्जड दम भारताने पाकिस्तानला दिला आहे. ‘पहलगाममधील २२ एप्रिलचा दहशतवादी हल्ला हीच मुळात पहिली चिथावणी होती आणि भारतीय सैन्याने त्याचे उत्तर आपल्या कृतीतून दिले आहे,’ असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी स्पष्ट केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.