पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ओकारा आर्मी कँटवर भारताने ड्रोन अटॅक केला आहे. आज सकाळी हा हल्ला करण्यात आला. पाकिस्तानात सध्या दहशतीच वातावरण आहे. पाकिस्तानी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांना मृत्यूची भिती सतावत आहे. भारताकडून ज्या प्रकारची कारवाई सुरु आहे, त्यामुळे आपल्या छावणीवर कधीही हल्ला होऊ शकतो ही भिती त्यांच्या मनात आहे. 1971 च्या युद्धानंतर भारताने प्रथमच पाकिस्तान विरोधात इतकी मोठी कारवाई केलेली आहे. 1999 साली कारगिल युद्धाच्यावेळी भारतीय सैन्याने सीमा ओलांडली नव्हती. पण यावेळी भारताच्या क्षेपणास्त्रांनी थेट पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं आहे. भारताची लढाई ही दहशतवादाविरोधात आहे.
भारताने प्रत्युत्तराची जी कारवाई केली, त्यामुळे पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाबमधील सैनिकी छावण्यांमध्ये दहशत पसरली आहे. सध्या पाकिस्तानच्या सैन्य छावण्यांमधून मोठ्या प्रमाणात लोक बाहेर निघत आहेत. पाकिस्तान भारताच्या इतक्या मोठ्या कारवाईने गोंधळून गेला आहे. भारतीय सैन्य दलांनी 7 मे रोजी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला होता. पाकिस्तानातील निष्पाप जनता किंवा सैन्य तळांना टार्गेट केलं नव्हतं. पण चवताळलेल्या पाकिस्तानने काहीही विचार न करता मागचे दोन दिवस हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला.
भारतीय सैन्य दलांनी काय म्हटलय?
सलग दोन दिवस भारताने पाकिस्तानचे सर्व हवाई हल्ले परतवून लावले आहेत. पाकिस्तानी ड्रोन्स, मिसाईल्स हवेतच नष्ट करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी इस्रायलच्या आकाशात जे दृश्य दिसत होतं. ते काल रात्री भारतात दिसलं. यापुढे देखील पाकिस्तानच्या प्रत्येक नापाक कृतीला तसच प्रत्युत्तर दिलं जाणार, हे भारतीय सैन्य दलांनी स्पष्ट केलय.
दोन्ही बाजूने हल्ला
भारताने प्रत्युत्तर म्हणून लाहोर, इस्लामाबाद, कराची, सियालकोट, बहावलपूर, पेशावर आणि कोटली येथे कारवाई केली. भारताच्या सैन्य दलांनी काल आपली क्षमता दाखवून दिली. भारताची पाकिस्तानवर दोन्ही बाजूने हल्ला करण्याची रणनिती आहे. काल आकाशातून मिसाईल, तोफ गोळ्यांचा वर्षाव केला. आज भारत वॉटर स्ट्राइकच्या तयारीत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला.