सोन्याची किंमत: भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, या वाढत्या तणावादरम्यान, सोन्याच्या दरात देखील वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 23 एप्रिल रोजी पहिल्यांदा सोन्याने 1 लाख रुपयांचा ऐतिहासिक विक्रम गाठला होता. त्यानंतर काही दिवसांनी सोन्याचे दर खाली आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी असल्याचं पाहायला मिळत आहे.
आज सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. आज (9 मे 2025)24 कॅरेट सोने 99610 रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकले जात आहे. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचे दर 100 रुपयांनी घसरुन 98900 रुपये प्रति किलोवर आले आहेत.
मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोने 91310 रुपये दराने विकले जात आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 99610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर, येथे 24 कॅरेट सोने 99760 रुपयांना विकले जात आहे. तर मुंबईत कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादप्रमाणेच 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 91310 रुपयांना विकले जात आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 91460 रुपये आहे. दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत चांदीचा दर प्रति किलो 98900 रुपये आहे. जर आपण अमेरिकेत सोन्याच्या किमतीबद्दल बोललो तर तिथेही गुंतवणूकदार सध्या सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानत आहेत. यामुळे, त्यांचे डोळे या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या अमेरिका-चीन व्यापार चर्चेवर लागले आहेत.
दरम्यान, जागतिक बाजारात अस्थिरता वाढल्यानं गुंतवणूकदारांकडून सोने खरेदीला प्राधान्य देत आहेत. शेअर बाजारात अस्थिरता वाढल्यानं गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदी करत आहेत. शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा गुंतवणूकादारांनी सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळं दिवसेंदिवस सोन्याच्या दरातच वाढ होत आहे. जेपी मॉर्गन बँकेच्या अंदाजानुसार 2026 पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 4000 डॉलर प्रति औंसवर जाऊ शकतात. दुसरीकडे मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार यार्डेनी रिसर्चचे अध्यक्ष एड यार्डेनी यांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 4000 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचतील तर 2026 पर्यंत सोन्याचा दर 5000 डॉलर प्रति औंस होऊ शकतो. या अंदाजानुसार सोन्याचे दर या वर्षीच 135000 रुपयांचा टप्पा ओलांडतील. तर, 2026 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर 153000 रुपये असू शकतो. जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार 2025 च्या अखेरपर्यंत सोनं आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 3700 डॉलर प्रति ओंस असू शकतात. तर, पुढील वर्षी सोन्याचे दर 4500 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..