India Pakistan War News LIVE : उत्तराखंडातील रुग्णालयांना सतर्कतेचे निर्देश
esakal May 09, 2025 03:45 PM
Uttarakhand Live: उत्तराखंडातील रुग्णालयांना सतर्कतेचे निर्देश

उत्तराखंड सरकारने राज्यातील सर्व रुग्णालयांना उच्च सतर्कतेवर राहण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनंतर, उत्तराखंडचे आरोग्य सचिव डॉ. आर. राजेश कुमार यांनी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये १२,००० खाटांची व्यवस्था राखण्यास सांगितले आहे. तसेच, सर्व आयसीयू आणि व्हेंटिलेटर्स सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Jammu Kashmir Live : जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला जम्मूकडे रवाना

जम्मू काश्मीरमध्ये सध्या भीतीचे वतावरण आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्रओमर अब्दुल्ला उद्दामपूर मार्गे जम्मूकडे रवाना झाले आहेत.

Nagpur Live : भारतीय सैन्यविरोधात गरड ओकणाऱ्या तरुणाला नागपुरातून अटक..

सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय सैन्यविरोधात गरड ओकणाऱ्या नक्षल समर्थक तरुणाला नागपुरातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली.

India Pakistan War Live : देशातील अनेक ठिकाणी शाळांना सुट्ट्या

भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

India -Pakistan War : पीएसएल मॅच यूएईमध्ये होणार

भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पीएसएल मॅच यूएईमध्ये होणार आहेत.

Live : बगलिहार धरणाचे दरवाजे उघडले Live : पाकिस्तानकडून हल्ल्यांचं सत्र सुरूच; जम्मूमध्ये पुन्हा ५ स्फोट

पाकिस्तानकडून हल्ल्यांचं सत्र सुरूच आहे. आज शुक्रवारी पहाटे पुन्हा एकदा पाकिस्तानताने भारतावर हल्ला केला. यावेळी जम्मूतील पाच ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकू आल्याची माहिती आहे.

Shri Guru Ram Das Ji International Airport : अमृतसरमधील गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर सुरक्षा वाढवली

अमृतसर, पंजाब : श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत विमानतळाचे सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.

Salal Dam : चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडले

जम्मू आणि काश्मीर : चिनाब नदीवर बांधलेल्या रियासी येथील सलाल धरणाचे ३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या भारत-पाकिस्तानमध्ये तणावपूर्णस्थिती आहे.

Bangalore Accident : ब्याडगीजवळ अपघातात सहा ठार; दोन जखमी

बंगळूर : हावेरी जिल्ह्यातील ब्याडगीजवळ गुरुवारी (ता. ८) सकाळी झालेल्या भीषण अपघातात मोटारीमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटली असून हरिहर येथील रहिवासी फरान (वय २७), राणेबेन्नूर येथील रहिवासी एम्मिशिपा (१६), गोव्यातील पणजी येथील रहिवासी अलिशा (२०) आणि पुलखान (१७) अशी चौघांची नावे आहेत. अन्य दोघांची नावे समजू शकली नाहीत. सर्व मृत व्यक्ती राणेबेन्नूर शहरातील बेकरी व्यापारी अशोक यांचे नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे.

Omar Abdullah : भारताने पाकिस्तानचे 50 हून अधिक ड्रोन यशस्वीरित्या पाडले खाली

काल रात्री, जेव्हा पाकिस्तानने नियंत्रण रेषा (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमांवर (IB) विविध ठिकाणी झुंडीच्या स्वरूपात ड्रोन पाठवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, तेव्हा उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोट भागांमध्ये भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण विभागाने मोठ्या प्रमाणावर काउंटर-ड्रोन ऑपरेशन राबवले. या ऑपरेशनदरम्यान 50 हून अधिक ड्रोन यशस्वीरित्या निष्प्रभावी करण्यात आले. या कारवाईत L-70 गन, Zu-23 मिमी तोफा, शिल्का प्रणाली आणि इतर अत्याधुनिक काउंटर-UAS उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले आहे.

Omar Abdullah : पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला जम्मूमधील परिस्थितीचा आढावा घेणार

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केलंय की, "काल रात्री जम्मू शहर आणि विभागाच्या इतर भागांवर पाकिस्तानी ड्रोनने केलेल्या अयशस्वी हल्ल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी जम्मूला जात आहे."

Operation Sindoor : जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला, जैशचे 10 ते 12 दहशतवादी ठार

जम्मू : भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्री दहशतवाद्यांच्या एका गटाने सांबा येथे आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सतर्क असलेल्या बीएसएफ (सीमा सुरक्षा दल) जवानांनी जैश-ए-मोहम्मद संघटनेचे 10 ते 12 दहशतवादी ठार केल्याचं कळतं आहे.

Indian Army : कर्नाटकातील प्रार्थनास्थळांमध्ये आज नमाज पठण

बंगळूर : लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे सर्वत्र कौतुक होत आहे. या संदर्भात देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज (ता. ९) कर्नाटकातील सर्व प्रार्थनास्थळांमध्ये विशेष नमाज पठण केली जाईल, असे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री बी. झेड. जमीर अहमद यांनी सांगितले.

Helicopter Crashes in Uttarakhand : उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळून सहा ठार

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री मंदिराला जाणारे हेलिकॉप्टर काल सकाळी पावणेनऊच्या सुमारास कोसळून झालेल्या अपघातात चालकासह सहा जण ठार झाले. एक जण गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरूंचाही समावेश आहे. खासगी कंपनीच्या या हेलिकॉप्टरने एकूण सात यात्रेकरू गंगोत्रीला जात होते.

Operation Sindoor : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे बिथरलेल्या पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच

Latest Marathi Live Updates 9 May 2025 : पाकिस्तानच्या नऊ शहरांमध्ये गुरुवारी हारोप या अत्याधुनिक ड्रोनच्या साह्याने हल्ले झाले. लाहोर, गुजरांवाला, चकवाल, बहावलपूर, मियानो, कराची, छोर, रावळपिंडी आणि अटक येथे हल्ले झाले. हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विविध भागांमध्ये घबराट पसरल्याचे चित्र होते. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या ड्रोन हल्ल्यामध्ये चार सैनिक जखमी झाल्याचा दावा केला. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणांवर जोरदार मारा करून लाहोरची संरक्षण यंत्रणा निकामी करून टाकली. १९७१ च्या युद्धानंतर लाहोरवर भारताचा हा पहिलाच हल्ला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारताची दहशतवाद्यांविरुद्धची संयमित, नियंत्रित आणि तणाव टाळणारी कारवाई असून पाकिस्तानने यापुढे कोणतीही चिथावणीखोर कृती केल्यास ती संघर्ष वाढवणारी ठरेल, असा सज्जड दम भारताने पाकिस्तानला दिलाय. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री मंदिराला जाणारे हेलिकॉप्टर काल सकाळी पावणेनऊच्या सुमारास कोसळून झालेल्या अपघातात चालकासह सहा जण ठार झाले. एक जण गंभीर जखमी झाला. लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे सर्वत्र कौतुक होत आहे. या संदर्भात देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज कर्नाटकातील सर्व प्रार्थनास्थळांमध्ये विशेष नमाज पठण केली जाईल, असे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री बी. झेड. जमीर अहमद यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.