How much destruction can a nuclear bomb cause: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. या दरम्यान पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडून अणूबॉम्ब वापरण्याची धमकी दिली जात होती. भारताने त्या धमक्यांना भीक न घालता ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली. भारताच्या या मोहिमेनंतर पाकिस्तानकडून प्रतिहल्ला सुरु झाला आहे. दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न आहेत. दरम्यान, पाकिस्तानमधील इस्लामाबाद आणि कराचीत अण्वस्त्र हल्ला झाला तर परिणाम काय होतील? त्याची चर्चा सुरु झाली आहे.
‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टमध्ये अण्वस्त्र हल्ला झाला तर काय परिणाम होणार? त्याची माहिती दिली आहे. 100 सूर्यांचा प्रकाशसारखी चमक होईल. ज्या ठिकाणी अणूबॉम्बचा स्फोट होणार त्यापासून 50 किलोमीटर परिसरातील लोक अंध होतील. प्रखर प्रकाशासोबत तापमान दहा लाख डिग्रीपर्यंत जाईल. त्यामुळे सजीव प्राणी भस्म होतील. इमारती उद्धवस्त होतील. वादळी वारे वाहतील. 10 किलोमीटरपर्यंतची झाडे, इमारती नष्ट होतील. पृथ्वी प्रचंड तापलेली असणार आहे. त्यामुळे झाडे-झुडपे नष्ट होतील. इतकेच नव्हे तर स्टील आणि काच सुद्धा वितळून जातील. अवकाशात विशाल ढग तयार होईल. त्यामुळे रेडिओएक्टिव्ह कण 100 किमीपर्यंत पसरुन घातक रेडियशन निर्माण होतील.
अणूस्फोटाच्या पहिल्या तासात सुमारे दोन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. काही महिन्यांनंतर एक लाख लोक कर्करोगाने ग्रस्त होतील. ज्या ठिकाणी अणुबॉम्बचा स्फोट होईल ती जागा एक मोठी स्मशानभूमी बनेल. बहुतेक उंच इमारतींना आधार देणारे प्रचंड स्टीलचे खांब लोण्यासारखे वितळतील. वाळू इतकी गरम होईल की पॉपकॉर्नसारखी फुटणार आहे.
जगात 9 देशांकडे अण्वस्त्रे आहेत. त्यात अमेरिकेने अणूबॉम्बचा वापर जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर केला होता. त्यानंतर जगभरात अणूबॉम्बविरोधात मोहीम सुरु झाली होती. परंतु आजही अमेरिकेकडे सर्वाधिक 5748 अणूबॉम्ब आहेत. रशियाकडे 5580, चीनकडे 500 अणूबॉम्ब आहेत. भारताकडे 172, पाकिस्तानकडे 170 अणूबॉम्ब आहेत. त्यामुळे अणूबॉम्बचा वापर दोन्ही देशांना करणे सोपे नाही. भारताने तर प्रथण अणूहल्ला न करण्याचे बंधन स्वत:वर घातले आहे.