शुटींग बघायला गेली, नराधमानं किराणाच्या दुकानात डांबलं; ११ वर्षीय चिमुकलीवर रात्रभर लैंगिक अत्याचार, सकाळी मुलीनं.. | Kalyan
Saam TV May 09, 2025 10:45 PM

एका अकरा वर्षीय मुलीला दुकानात डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही संतापजनक घटना कल्याणजवळील आंबिवली परिसरात घडली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

असे आरोपीचे नाव आहे. तर, पीडित मुलगी कल्याण जवळील आंबिवली परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तिचे आई-वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. पाच मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी मैत्रिणीच्या घरी जाते असे सांगून घराच्या बाहेर पडली. मात्र ती सायंकाळी घरी परतली नाही.

पीडित मुलीच्या कुटुंबाने शोधाशोध केली. मात्र, ती काही सापडली नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित मुलगी घराच्या परिसरातच आढळली आहे. कुटुंबाने विचारपूस केली असता, तिने अतिप्रसंग घडल्याची माहिती आपल्या कुटुंबाला दिली. याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबाच्या सदस्यांची पायाखालची जमीन सरकली.

नेमकं घडलं काय?

आंबिवली येथील नदीकिनारी शूटिंग सुरू होती. ही शूटिंग पाहण्यासाठी अल्पवयीन मुलगी त्या ठिकाणी पोहोचली. नदीच्या परिसरातच गणेश म्हात्रे या नराधामाचे किराणामालाचे दुकान होते. गणेश याची नजर या अल्पवयीन मुलीवर पडली त्याने तिला दुकानात बोलवले, जबरदस्तीने दुकानात थांबण्यास सांगितले. मात्र या अल्पवयीन मुलीने विरोध करताच तिला दुकानात ओढून घेत दुकानाचे शटर बंद करून या मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम गणेश म्हात्रे याला बेड्या ठोकल्यात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.