'वेदांता'चा अनोखा उपक्रम
esakal May 09, 2025 11:45 PM

62756
62758
62759
जाहिरातीसाठीचा राईटअप (फुलपेज)

टीपः swt910.jpg ते swt914.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - वेदांता महिला क्रिकेट स्पर्धेतील काही छायाचित्रे.


ग्रामीण महिला सक्षमीकरणासाठी
‘वेदांता’चा अनोखा उपक्रम
लिड
आपल्या पुरुषप्रधान समाजात स्त्रियांना मर्यादित अधिकार आहेत. त्यांच्यातील कलागुण, क्रीडाकौशल्य जगासमोर यावे, याची व्यवस्था नाही. उलट ते येऊ नये असेच प्रयत्न होताना दिसतात. महिला आता अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत, पण त्या सर्व शहरी भागांतील, सधन परिवारातील स्त्रियांपुरतेच मर्यादित राहिले आहे. ग्रामीण भागांत आजही स्त्रिया चूल आणि मूल यातच आयुष्य घालवत आहेत; पण हे चित्र बदलण्याचा प्रयत्न वेदांता सेसा कोक वझरे आणि नव युवा मंच यांनी केला. वेदांता महिला क्रिकेट स्पर्धा (व्हीडब्ल्यूटीसी) ही केवळ या प्रदेशातील पहिलीच स्पर्धा नव्हती, तर ती ग्रामीण महिलांना त्यांच्यातले क्रीडाकौशल्य व क्षमता दाखवण्याची संधी देऊन त्यांना प्रकाशझोतात आणण्याचा एक सशक्त प्रयत्न होता.
............................
दुर्गम भागात, जिथे महिलांचे खेळ हे त्यांच्याच ग्रामीण जीवनाशी सुसंगत असतात. पारंपरिक पद्धतीने, उत्सवाच्या प्रसंगी खेळले जातात. बहुतांश ते महिलांना अंगणापलीकडे घेऊन जात नाहीत. त्यांच्यासाठी क्रिकेटचे मैदान हे फार तर मुलांना दटावून घरी बोलावताना दिसण्याचा संभव. अन्यथा त्याचा व त्यांचा फारसा संबंध कधी आलाच नाही. वेदांता महिला क्रिकेट स्पर्धेत (व्हीडब्ल्यूटीसी) १४ ते ६२ वयोगटातील ६० हून अधिक महिलांनी एकत्र येऊन क्रिकेट सामन्यांत स्वत: भाग घेतला. यात महिलांचे पाच उत्साही संघ - रवळनाथ वॉरियर्स’, हर हर महादेव’, नेक्सस’, विक्रम वॉरियर्स’ आणि सनशाइन क्रिकेटर्स’ सहभागी झाले होते. ग्रामीण
भागातल्या महिला क्रिकेट उत्तम पद्धतीने खेळू शकतात, याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते.
भारतीय महिला क्रिकेट संघासाठी खेळण्याचे स्वप्न पाहणार्या तरुणीपासून ते हातात कधीही बॅट न धरलेल्या लक्ष्मी नाईक या ६२ वर्षीय महिलेपर्यंत सर्व वयोगटातील, सर्व स्तरावरील महिलांचा सहभाग, हे या उपक्रमाचे खरे वैशिष्ट्य होते. पहिल्यांदाच क्रिकेट खेळलेल्या लक्ष्मी नाईक यांनी सांगितले, कि मला कधीच वाटले नव्हते की मला माझ्या आयुष्यात क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल. ज्या क्षणी मी मैदानावर पाऊल ठेवले, तेव्हा मला असे वाटले की मी स्वत:साठी खेळत नसून माझ्यासारख्या असंख्य स्त्रियांना खेळता यावे यासाठी खेळत आहे. ही स्पर्धा फक्त क्रिकेटपुरतीच नाही. ग्रामीण भागातील महिलांना संधी मिळाल्यास त्या काहीही साध्य करू शकतात, हे सिद्ध करण्यासाठी आहे.
ही कोणतीही सामान्य स्पर्धा नव्हती. ही या प्रदेशातील पहिलीच महिला क्रिकेट स्पर्धा होती आणि यामुळे महिलांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी केवळ एक व्यासपीठ उपलब्ध झाले नाही तर समाजात कायमस्वरूपी बदल घडण्याचा मार्गही मोकळा झाला. या कार्यक्रमाने सिद्ध केले, की सक्षमीकरण हे केवळ कौशल्य प्रमाणपत्रे किंवा रोजगाराशी बांधील नाही; महिला सक्षमीकरण म्हणजे एखाद्या स्त्रीच्या क्षमतेवर, आपलेपणावर, तिला तिच्या स्त्रीत्वाची ओळख मिळवून देणे आहे.
संघ केवळ विजयासाठी नव्हे तर सक्षमीकरणाच्या कल्पनेसाठी खेळला तेव्हा प्रत्येक संघच जिंकला होता. अनेक महिलांसाठी ही त्यांची पहिलीवहिली क्रिकेट स्पर्धा होती, तरीही त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काहींना, महिला क्रिकेट स्पर्धेची संकल्पना कदाचित एक अशक्यप्राय उपक्रम वाटली असेल. परंतु पहिल्यांदाच या खेळाचा अनुभव घेणार्या ६२ वर्षीय महिलेचा उत्साह, भविष्यात होणार्या प्रवासाबद्दल बरेच काही सांगून जातो. ही स्पर्धा केवळ कौशल्याचे प्रदर्शन नव्हती; ती सामुदायिक सहभागाच्या शक्तीची आणि खर्या अर्थाने परिवर्तनास चालना देणार्या उपक्रमांच्या भूमिकेची साक्ष होती.
नव युवा मंचासारख्या स्थानिक संस्थांसोबत भागीदारी करून, वेदांता सेसा कोक, वझरे यांनी एक असे व्यासपीठ तयार केले, ज्यामुळे स्थानिकांना त्यांच्या गरजा आणि आकांक्षांनुसार संधी निर्माण झाली. जेव्हा सीएसआर उपक्रम लोकांच्या सक्रिय सहभागाने आणि सांघिक जाणिवेने केला जातो, तेव्हा तो आर्थिक निकषांच्या पलीकडे जाणारे परिवर्तन घडवून आणू शकतो. ही स्पर्धा, असे उपक्रम महिलांना सक्षम बनवू शकतात, सामाजिक मर्यादांना आव्हान देऊ शकतात, किंबहुना त्या ओलांडून नवीन क्षितिज गाठू शकतात, याचा हा उपक्रम म्हणजे एक वस्तुपाठ होता.
आयीचे सरपंच तुषार नाईक म्हणाले, कि वेदांता महिला क्रिकेट स्पर्धेसारखे उपक्रम तळागाळात क्रीडा संस्कृती वाढवण्यासाठी आणि त्याच वेळी महिलांना सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. आपल्या समाजातील महिला अशा स्पर्धांत भाग घेण्यासाठी पुढे येत आहेत हे पाहून मला त्यांचा अभिमान वाटतो.’
वेदांता सेसा कोक वझरेचे प्रमुख प्रणय वालावलीकर म्हणाले की, ‘वेदांता महिला क्रिकेट स्पर्धा ही केवळ एक स्पर्धा नाही. ही महिलांची इतक्या वर्षांची दबलेली अनोखी प्रतिभा आहे. काही तरी करून दाखवू शकतो, हा विश्वास आहे. विशेषतः ग्रामीण भागांतील महिलांसाठी. आम्ही येथे जे पाहिले ते फक्त क्रिकेट नव्हते; अशा व्यासपीठापासून वंचित राहिलेल्या महिलांसाठी ही एक प्रेरणा होती. या महिलांनी दाखवलेला उत्साह, उत्स्फूर्तता, नवे काहीतरी करून दाखवण्याची ऊर्मी म्हणजे परिवर्तनासाठी महिला सक्षम असल्याची ग्वाही आहे.’
या स्पर्धेत विक्रम वॉरियर्स’ या महिला संघाने विजेतेपद मिळवले. असे असले तरीही कोणताच संघ हरला नव्हता. दीर्घकाळ असलेल्या बंधनांपासून मुक्त होऊन स्वप्न पाहणे त्यांनी अनुभवले होते; त्याचा हा विजय होता.
व्हीडब्ल्यूसीटीने महिला खेळाडूंच्या पुढच्या पिढीसाठी प्रेरणास्रोत म्हणूनही काम केले. आयपीएलमध्ये खेळण्याची आकांक्षा तरुणांना असते, तसेच स्वप्न आता ग्रामीण महिलांना पाहण्याची संधी लाभली आहे. कदाचित, एके दिवशी, यापैकी काही महिला वैभव सूर्यवंशीसारख्या आदर्श खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेवून महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) मध्ये खेळताना दिसतील. स्पर्धेची सांगता झाली; पण, वातावरणात उत्साहाची भावना तशीच टिकून होती. हा एका उपक्रमाचा शेवट असला तरी खर्या अर्थाने ती ग्रामीण महिलांच्या नवीन भविष्याची सुरुवात होती. चाकोरीबद्ध आयुष्य जगणार्या महिलांना वेदांता महिला क्रिकेट स्पर्धेने एक नवे क्षितिज, नवा आसमंत उलगडून दाखवला आहे. त्यांच्या पंखांत बळ भरले आहे. रांधा, वाढा, उष्टी काढा’ यापलीकडचे जग दाखवले आहे. क्रिकेट स्पर्धा हे एक त्याचे माध्यम आहे. यातून अनेक महिला आपले क्षितिज ओळखतील आणि त्याला निश्चितच गवसणी घालतील.
-----------------

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.