भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) चालू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चे उर्वरित सामने एका आठवड्यासाठी तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित अधिकारी आणि भागधारकांशी सल्लामसलत करून परिस्थितीचा व्यापक आढावा घेतल्यानंतर स्पर्धेचे नवीन वेळापत्रक आणि ठिकाणांबाबत पुढील अपडेट्स योग्य वेळी जाहीर केले जातील.