ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आजचा सांगोला दौरा रद्द झाला आहे.
महत्वाची बैठक असल्याने तातडीने मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे.
शरद पवार आज सांगोला तालुक्यातील महूद येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंब बागेची पाहणी करण्यासाठी सकाळी 10 वाजता येणार होते.
India Pakistan War: श्रीनगरमध्ये भारताने पाडले पाकिस्तानची २ विमानेभारताने शौर्य दाखवत 100 पेक्षा अधिक ड्रोन निष्प्रभ केले आणि पाकिस्तानच्या हल्ल्याला करारा प्रतिउत्तर दिले.
धाराशिव जिल्ह्यातील नागरीकांना उन्हाच्या झळा व उकाड्यापासून दिलासाधाराशिव जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांच्या तापमानात तब्बल 5.7 अंश सेल्सियसची घट झाल्याने उन्हाच्या तिव्रतेत कमालीची घट झाली आहे.
याशिवाय राञी च्या वेळी किमान तापमान देखील 2.1 अंश सेल्सिअसने घटले आहे त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या चटक्यासह उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
अवकाळीच्या वातावरणामुळे दुपारच्या उन्हाची ताप व रात्रीच्या उखड्यात कमालीची घट झाली आहे.अधून-मधून ढगाळ हवामान निर्माण होत असल्याने हवेत गारवा जाणू लागला आहे.
त्यामुळे काही दिवसांपासून हवेच्या उष्ण झळांनी बेजार झालेल्या नागरिकांचा त्रास कमी झाला असून अवकाळीच्या वातावरणामुळे दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा चार ते साडेपाच डिग्रीने घट झाली आहे.
ऊन कमी झाल्याने दुपारी घराबाहेर पडणे शक्य झाले आहे.त्यामुळे दुपारी रस्ते,बाजार पेठेमध्ये जाणवणारा शुकशुकाट दूर झाल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे.
India Pakistan War: काल रात्री फिरोजपूरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्लाकाल रात्री फिरोजपूरमधील एका निवासी भागात एका पाकिस्तानी ड्रोनने हल्ला केला आणि एका कुटुंबाला जखमी केले. कुटुंबाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी कुटुंबाच्या घराबाहेरील दृश्ये समोर आली आहेत.
Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस सतर्क सागरी गस्तीला प्राधान्यअवकाळी पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकाचे नुकसान
रत्नागिरीत आजपासून कृषी महोत्सव , तीन दिवस असणार हा कृषी महोत्सव
रत्नागिरी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द , देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे रत्नागिरीतील पोलीस दल अलर्ट मोडवर
Unseasonal Rain: राज्यातील वादळी पावसाचे वातावरण कायममागील ३ दिवसांपासून काही ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे उन्हाचा चटकाही कमी झालेला दिसत आहे.
हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
३ दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पाऊस काही ठिकाणी हजेरी त्यामुळे उन्हाळी पिकांसह फळपिकांचे नुकसान
पुढील ४ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही पुढील ४ दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्यातही पावसाला पोषक हवामान आहे.
Pune International Airport: पुणे विमानतळावरील सलग तिसऱ्या दिवशी उड्डाण तात्पुरती स्थगितआज इंडिगो आणि स्पाइस जेट या कंपन्यांचे 9 उड्डाण रद्द
याबाबत संबंधित प्रवाशांना विमानतळ प्रशासन आणि विमान कंपन्यांकडून वेळेवर माहिती देण्यात आली आहे. या प्रवाशांना पूर्ण परतावा किंवा पर्यायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
रद्द झालेली उड्डाणे
इंडिगो एअरलाइन्स : अमृतसर- पुणे, चंडीगड- पुणे, पुणे- चंडीगड, पुणे- अमृतसर, नागपूर-पुणे, पुणे- जोधपूर, जोधपूर- पुणे.
Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावरील पर्यटन पुढील चार दिवस बंद, अलर्ट जारीदेशात निर्माण झालेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे जायकवाडी धरणावरील पर्यटन पुढील चार दिवस बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
पुढील चार दिवस जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
तर प्रशासनाच्या वतीने जायकवाडी धरणावर सायनाचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहे.
आशिया खंडातील मातीचे धरण म्हणून जायकवाडी धरण हे ओळखलं जातं, मागील चार दिवसांपूर्वी या ठिकाणी एसटीआयच्या पथकाने देखील भेट दिली होती.
जायकवाडी धरणावरती छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड, उप जिल्हाधिकारी निलम बाफना,तहसीलदार दिनेश झांपले यांनी धरण सुरक्षेबाबत आढावा घेऊन काही महत्त्वपूर्ण सुचना दिल्या.
Konkan Rain: कोकणात सध्या अवकाळी पावसाचा खेळ सुरुकोकणात सध्या अवकाळी पावसाचा खेळ सुरु आहे..
या अवकाळी पावसामुळे उष्याने हैराण झालेल्या नागरीकांना थोडा गारवा मिळालाय मात्र या पावसामुळे सर्वाधिक आनंद झालाय तो मोराला....
साखरप्यातील पुर्ये गावात मोर दिसलाय हा मोर पावसाचा आनंद घेत पिसारा फुलवून नाचताना दिसतोय..
मोरांचा थवाच या गावात पहायला मिळाला...
राष्ट्रीय पक्षी असेला हा मोर कोकणात दुर्मिळच पहायला मिळतो.
त्याच पावसात पिसारा फुलवून मोराच नृत्य आणखीनत दुर्मिळ...हा अद्भूत नजारा मोबाईल मध्ये कैद झालाय...
Shirpur: शिरपूर येथे दोन ठिकाणी वरली मटका अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकांचा छापावाशिमच्या शिरपूर येथे दोन ठिकाणी सुरू असलेल्या वरली मटका अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केलीये. या कारवाईत २६ आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, २ लाख ९७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन ठिकाणी मारलेल्या छाप्यात ३१,२८० रुपयांच्या रोख रकमेसह १७ मोबाइल फोन्स (किंमत १.७१ लाख), दुचाकी वाहने असा एकूण २.९७लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा स्थगित, कर्जमाफीसाठी निघणार होता मोर्चाशेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या भारत पाकिस्तान दरम्यान युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रीय भावनेतून शिवसेना ठाकरे पक्षाने मोर्चा स्थगित केल्याची जाहीर केले असून हा ट्रॅक्टर मोर्चा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार होता.
मोर्चाचे नेतृत्व खासदार अरविंद सावंत, खासदार संजय देशमुख, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आला होते.
प्रशासनावर ताण येऊ नये या दृष्टिकोनातून ट्रॅक्टर मोर्चा रद्द केल्याचे शिवसेना ठाकरे च्या वतीने जाहीर करण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यातील कृषी केंद्राची तपासणीखरीप हंगामाच्या दृष्टीने गुणवत्ता नियंत्रण पथकाने ॲक्शन प्लॅन तयार केला असून यवतमाळ जिल्ह्यातील चार हजार कृषी सेवा केंद्राचे परवाने व इतर नोंदणी केलेले बियाणे, कीटकनाशक खताची तपासणी केली जाणार आहे. खरीप हंगामापूर्वी गुणवत्ता विभागाने तपासणी मोहिमेचा निर्णय घेतलाय त्या अनुषंगाने येत्या काही दिवसात ही मोहीम यवतमाळ जिल्हाभरात राबवली जाणार असून प्रत्येक कृषी सेवा केंद्राची तपासणी या मोहिमेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
ढोकी येथुन गावठी कट्ट्यासह एकाला ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाईधाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा कारखाना समोरील पारधी पिढी येथुन एकाला गावठी कट्ट्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत कारवाई केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या मिळालेल्या माहितीनुसार एका विधी संघर्षग्रस्त बालकाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी पंचासमक्ष पाहणी करुन विचारणा केली असता सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली
माञ अधिक विश्वासात घेवुन विचारणा केली असता गावठी कट्टा घरात लपवुन ठेवण्याची माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त जप्त केला आहे.