Bollywood Entertainment News : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश सध्या युद्धजन्य परिस्थितीतून जात आहेत. त्यातच काही पाकिस्तानी नागरिक भारतीय कलाकारांना ट्रोल करत आहेत. त्यातच कॅन्सरचा सामना करत असलेल्या अभिनेत्रीने पाकिस्तानी ट्रोलर्सना खडेबोल सुनावले होते.
ही अभिनेत्री आहे हिना खान. हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सर या गंभीर आजाराचा सामना करत आहेत. सोशल मीडियावर ती तिच्या प्रकृतीच्या अपडेट्स शेअर करत असते. त्यातच तिने भारत-पाकिस्तानच्या तणावग्रस्त वातावरणाबद्दल भाष्य करत पाकिस्तानी ट्रोलर्सना खडेबोल सुनावले.
हिनाचे फक्त भारतातच नाहीत तर पाकिस्तानमध्येही अनेक चाहते आहेत. भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर हिनाने भारतीय सैन्याला पाठींबा देणारी पोस्ट शेअर केली. याबरोबरच दोन्ही देशांमधील परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणूनही तिने अल्लाहला प्रार्थना केली. त्यानंतर हिनाला काहीजणांनी ट्रोल केलं. यानंतर हिनाने पोस्ट करत त्यांना सडेतोड उत्तर दिलं.
हिनाने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली. त्यात तिने म्हटलं की,"माझं संपूर्ण आयुष्य मला सीमेपलीकडूनही मिळणारं प्रेम अनुभवण्यात गेलं आहे. मी माझ्या देशाला ऑपरेशन सिंदूर आधी आणि नंतर पाठींबा देणारी पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी मला शिवीगाळ केली, अनेकांनी अनफॉलो केलं. काहींनी तर मला अनफॉलो करण्याची धमकी दिली. या धमक्यांबरोबर शिवीगाळ, वाईट कमेंट्स आणि तिरस्काराने भरलेल्या होत्या. ज्या माझ्या आजाराशी, माझ्या श्रद्धेशी जोडलेल्या होत्या. "
"तुम्ही माझ्या देशाला पाठींबा द्यावा अशी मी अपेक्षा करत नाही. तुम्ही तुमच्या देशाला पाठींबा द्या. ते ठीक आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टींमधील गंभीर परिणाम आणि चुका समजून घ्यावात अशी मी अपेक्षा करत नाहीत. तुम्ही माझ्याशी मानवतेच्या दृष्टिकोनातून वागाल. जशी मी तुमच्याशी वागते अशी अपेक्षा करते.
पण मी विचार केला, आपल्यात हाच फरक आहे. मी भारतीय नसले तर मी काहीच नाहीये. मी कायमच पहिली भारतीय असेन. तर तुम्ही मला अनफॉलो करू शकता. तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला शिवीगाळ करणार नाही. मी फक्त माझ्या देशाला पाठींबा देईन. तुम्ही जे बोलता ते तुमचं व्यक्तिमत्त्व असतं. तुम्ही जे निवडता ते तुमचे आदर्श असतात. एखाद्या कठीण काळात तुम्ही माणूस म्हणून जसे वागता ती तुमची माणूस म्हणून ओळख बनतं." पुढे म्हणाले.
"याचा माझ्याशी काहीही संबंध नाहीये. काहीही झालं तरीही मी माझ्या देशाचीच साथ देणार आहे. जय हिंद." अशी पोस्ट तिने केली. सोशल मीडियावर हिनाची पोस्ट व्हायरल झाली आहे.