India Attack Pakistan: 19 सेकंदातच खेळ खल्लास! जेथून भारतावर हल्ले तेच पाकिस्तानचे लाँच पॅड उडवले; दहशतवाद्यांचा खात्मा,पहा व्हिडिओ..
Sarkarnama May 10, 2025 10:45 PM

India-Pakistan War : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या हद्दीत 100 किलोमीटर आत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यांनतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने दहशतवाद पुरस्कृत पाकिस्तानचा बदला घेतला आहे. एकीकडे गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानकडून हल्ले सुरु असताना भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्यूत्तर दिले. त्यातच आता बीएसएफने आणखी एक मोठी कारवाई केली असून अवघ्या 19 सेकंदातच खेळ खल्लास केला आहे. जेथून भारतावर हल्ले करण्यात आले तेच पाकिस्तानचे लाँच पॅड उडवत सात दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

भारतीय लष्कराने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. ज्याचा व्हिडिओही समोर आला आहे. बीएसएफने पाकिस्तानातील सियालकोटमधील दहशतवादी लाँच पॅड पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. बीएसएफने या कारवाईचा व्हिडिओही जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये बीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानमधील हे लाँच पॅड कसे उद्ध्वस्त झाले आहेत हे स्पष्टपणे दिसून येते. पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारानंतर बीएसएफने ही कारवाई केली आहे.

पाकिस्तानच्या सियालकोटमधील हे तेच लाँच पॅड होते. जिथून पाकिस्तान भारतीय सीमेत दहशतवादी पाठवत होता. या लाँच पॅड्सच्या विनाशामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तान संतापला आहे. यामुळेच तो नियंत्रण रेषेला लागून असलेल्या गावांवर सतत गोळीबार करत आहे. ज्याला भारतीय सैन्यही पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देत आहे.

दरम्यान, शुक्रवारी बीएसएफने केलेल्या या कारवाईत सात दहशतवादी ठार झाले. बीएसएफने आता या कारवाईबाबत एक व्हिडिओ देखील जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानमधून दहशतवादी कसे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत हे पाहता येते. पण सीमेवर उपस्थित असलेल्या आपल्या सैन्याने त्यांचा त्याठिकाणी खात्मा केला आहे.

दरम्यान, भारताने पु्न्हा एकदा पाकिस्तानात घुसून हल्ला केला. पाकिस्तानचे पाच विमानतळांवर भारताने हल्ला चढवत एअरबस उद्ध्वस्त केल्या आहेत. भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानचे रावळपिंडीतील नूरखान, सिंधमधील सुकूर, चकवालमधील मुरीद, पाकिस्तातील पंजाबमधील रफिकी, रहिमयार खान हे एअरबेस भारतीय लष्कराने फायटर प्लेन आणि ड्रोनच्या साहाय्याने उद्ध्वस्त केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.