7 Out of 10 People Miss Asthma Diagnosis: आधुनिक काळात अनेक आजारांवर संशोधन होऊन उपचार होत आहेत. परंतु दमा आजाराचे रुग्ण कमी होण्यापेक्षा वाढत आहेत. याला आनुवंशिकतेसोबत प्रदूषण सर्वाधिक कारणीभूत आहे. १० पैकी ७ जण दमा निदानापासून दूर असल्याचे निरीक्षण श्वसनरोग तज्ज्ञांनी नोंदविले असून बाल दम्याचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
दमा श्वसन विकार असून याचे दोन प्रकार आहेत. सर्वसामान्य व दीर्घकालीन दमा. सर्वसामान्य दम्यावर नियंत्रण मिळवता येते. परंतु दीर्घकालीन दमा गंभीर समस्या आहे. फुफ्फुसातील दोन प्रकारच्या श्वसननलिकांवर याचा परिणाम होतो.
छोट्या श्वसननलिकांचा आतील व्यास दोन मिलिमीटरपेक्षाही कमी असतो. वंश पंरपरा, ॲलर्जी, धूम्रपान, वायुप्रदूषण, मानसिक ताणतणाव यामुळे दमा होतो. वायुप्रदूषण थेट फुफ्फुसावर परिणाम करते. तर सिगारेट किंवा विडीच्या धुरात चार हजार विषारी पदार्थ असतात, असे डॉ. विक्रम राठी म्हणाले. यावर नियंत्रणासाठी जागतिक स्तरावर सर्वांसाठी इनहेल्ड उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सिप्लाचा बेरोक जिंदगी आणि टफीजसारखे उपक्रम राबविण्यात येत आहे.
दम्यास कारणीभूत- वाढते प्रदूषण
- औद्योगिकरण
- कारखान्याचा धूर
- धुळीचे कण
- आनुवंशिकता
दमा ही अनुवंशिक व्याधी आहे. प्राण्यांच्या सहवासात असणाऱ्यांना आणि मानसिक तणावात वावरणाऱ्या व्यक्तींना दमा होण्याची दाट शक्यता असते. दम्यावरील नियंत्रणासाठी औषध घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे श्वासावाटे घेणे हा होय. इनहेलर प्रणाली यासाठी फायदेशीर आहे.
- डॉ. विक्रम एम. राठी, श्वसनविकार तज्ज्ञ, नागपूर