व्यायामासाठी वेळ नाही? मग तंदुरुस्त राहण्यासाठी 'या' गोष्टी फॉलो करा!
esakal May 11, 2025 04:45 AM
Easy Habits to Stay Healthy & Fit व्यायाम

व्यायामासाठी वेळ काढणं शक्य नसेल, तरी आरोग्य राखण्यासाठी काही सोप्या सवयींचा अंगीकार करा.

Easy Habits to Stay Healthy & Fit भुकेपेक्षा

नेहमी भुकेपेक्षा कमी खा आणि पचायला सोपा, सात्विक आहार घ्या. हे पचन सुधारतं आणि शरीर हलकं वाटतं.

Easy Habits to Stay Healthy & Fit बाहेरचं खाणं टाळा

बाहेरचं तिखट-तेलकट खाणं टाळा. खाल्लंच तर हलकं आणि कमी मसालेदार अन्न घ्या.

Easy Habits to Stay Healthy & Fit शाकाहारी अन्न

प्रवासात नॉनव्हेज खाणं पचनासाठी त्रासदायक ठरू शकतं, म्हणून फक्त पचायला सोपं शाकाहारी अन्न खा.

Easy Habits to Stay Healthy & Fit पाणी

दररोज 3-4 लिटर पाणी प्या. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि त्वचाही चमकदार राहते.

Easy Habits to Stay Healthy & Fit जेवणात ताक आणि सॅलड ठेवा

दुपारच्या जेवणात ताक, काकडी, गाजर यासारखं सॅलड ठेवा. यामुळे पचन सुधारतं आणि शरीराला थंडावा मिळतो.

Easy Habits to Stay Healthy & Fit फळं

सफरचंद, अंजीर, पेरू यांसारखी सिझनल फळं खाल्ल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वं मिळतात आणि भूकही मिटते.

Easy Habits to Stay Healthy & Fit व्यसनांपासून लांब रहा

सिगारेट, दारू, कोल्डड्रिंक्स यांसारख्या व्यसनांपासून दूर राहा – यामुळे लिव्हर, फुफ्फुसं आणि संपूर्ण शरीर निरोगी राहतं.

Easy Habits to Stay Healthy & Fit चालणे

दररोज काही मिनिटं चालायला जा आणि मानसिक शांततेसाठी विपश्यना किंवा ध्यान करा.

Easy Habits to Stay Healthy & Fit झोप

पूर्ण झोप म्हणजे ऊर्जेचा साठा! रोज ७-८ तासांची झोप घेतल्यास शरीर आणि मन दोन्ही ताजं राहतं.

kidney health किडनी राहील फिट! आहारात आजच 'या' 8 पदार्थांचा समावेश करा"
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.