ALSO READ:
भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या संघर्षामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारत आणि पाकिस्तान एकमेकांवर हल्ले करत आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे भारताचे काही जवान शहीद झाले आहे. दोन्ही कडून ड्रोन हल्ले सुरु आहे. या संघर्षाच्या स्थितीत मुंबई पोलिसांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
ALSO READ:
भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षावर मुंबई पोलीस सक्रिय मोड आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी महत्त्वाचा आदेश काढला आहे. मुंबई पोलिसांनी उद्या 11 मे पासून 1 जून पर्यंत फटाके आणि रॉकेट फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचा उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहे.
ALSO READ:
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 व्या कलम 10 मधील पोटकलम 2 सह कलम 33 च्या पोटकलम 1 च्या खंडनुसार मुंबई पोलिसांनी शहरात फटाके, रॉकेट उडवण्यावर बंदी घातली आहे. या आदेशाची माहिती पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी, लाऊडस्पीकर, मेगाफोनवरून दिली जाणार आहे.
Edited By - Priya Dixit