भारत आणि पाकिस्तानदरम्यान युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या कालावधीत तुमच्या कानावर दररोज नवनवीन शब्द पडत आहेत. कदाचित हे शब्द तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. जाणून घेऊयात त्याचा अर्थ...
एलएसी म्हणजे लाईन ऑफ अक्युअल कंट्रोल. भारत आणि चीनदरम्यान 3,488 किमी लांब अनौपचारिक सीमा आहे. पश्चिम लडाख ते पूर्ण अरुणाचल प्रदेशपर्यंत ही नियंत्रण रेषा आहे.
लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे एलओसी. भारत आणि पाकिस्तानदरम्यान जम्मू-काश्मीर राज्यात ही नियंत्रण रेषा आहे. 1971 च्या युध्दानंतर सिमला करारांनंतर अस्तित्वात. अस्थायी रेषा असून दोन्ही देशांच्या नियंत्रित क्षेत्रांना वेगळे करते.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान मान्यताप्राप्त सीमा. आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार दोन्ही देशांनी ही सीमा मान्य केली आहे. पंजाब, राजस्थान आणि गुजरात राज्यांना लागून आहे. वाघा-अटारी बॉर्डर या सीमेचा भाग आहे.
भारतीय लष्कराकडील ही अध्यानिक सुरक्षा प्रणाली आहे. शत्रूचे ड्रोन्स, मिसाईल, लढाऊ विमानांना ट्रॅक करून ती निकामी करण्यासाठी वापर केला जातो. यामध्ये रडार, रेडिओ फ्रिक्वेंसी, ऑप्टिकल कॅमेरा आणि ध्वनी डिटेक्टरचा वापर केला जातो.
शत्रूची विमाने, मिसाईल आणि ड्रोन्सच्या धोक्याची माहिती लगेच मिळते. राजेंद्र, स्वॉर्डफिश आणि रोहिणी ही भारतीय स्वदेशी रडार यंत्रणा आहे. एस-400, आकाश आणि बराक-8 अशा हवाई सुरक्षा यंत्रणेसोबत शत्रूचा हल्ला परतविण्यासाठी महत्वाची.
लष्कराच्या मुख्यालयाला कमांड आणि कंट्रोल सेंटर म्हटले जाते. याठिकाणी युध्दाची रणनीती ठरविली जाते. लष्कराचा आवश्यक आदेश, सुचना इथून दिल्या जातात.
ही एक आधनिक स्वदेशी तोफ आहे. लांबपल्ल्याच्या ठिकाणी लक्ष्यभेद करण्याची क्षमता. इलेक्ट्रिक यंत्रणेमार्फत ती चालविली जाते. युध्दात ही तोफ गेमचेंजर ठरू शकते.
युध्दात तोफा, रॉकेट्स आणि मिसाईल्सचा वापर करणारे लष्करातील स्वतंत्र दल. शत्रूचे सुरक्षाकवच भेदण्यात महत्वाची भूमिका असते.
लष्कराच्या पायदळ विभागाला इन्फंट्री म्हणतात. शत्रूशी समोरासमोर भिडणारे हे दल लष्कराचा मोठा भाग आहे.