भारतासोबतच्या सैन्य संघर्षात एका विमानाच नुकसान झाल्याच पाकिस्तानी सैन्याने रविवारी रात्री उशिरा कबूल केलय. पाकिस्तानच्या एका विमानाच छोटस नुकसान झालय असं पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितलं. भारताने पाकिस्तानच कुठलं विमान पाडलं, ते त्यांनी सांगितलं नाही. आकाशात डॉग फाईट सुरु असताना असं कुठल्या विमानाच छोटस नुकसान होत नाही. मिसाइल हिट झाल्यानंतर विमान खालीच कोसळतं. फक्त हे सत्य पाकिस्तानला स्वीकारायच नसेल. त्याआधी भारतीय सैन्यदलाने प्रेस ब्रीफिंगमध्ये पाकिस्तानी जेट पाडल्याचे संकेत दिले होते. हा आकडा किती आहे, ते लवकरच समोर येईल असं भारतीय सैन्य दलाने म्हटलय. इंडियन एअर फोर्सचे महासंचालक एअर ऑपरेशनल (DGAO) एअर मार्शल एके भारती यांना प्रेस ब्रीफिंगमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला.
भारताने पाकिस्तानची किती फायटर जेट विमानं पाडली?. त्यांनी उत्तर दिलं की, ‘प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानचे अनेक ड्रोन्स आणि जेट्सला हिट केलं’ पाकिस्तानची कुठली विमान पाडली? ते त्यांनी सांगितलं नाही. पण ते एक हायटेक विमान होतं, एवढच सांगितलं, आता पाकिस्तानी सैन्य दलाने स्वत: विमानाच नुकसान झाल्याची कबुली दिली आहे.
‘अशा गोष्टी लपून राहत नाहीत’
‘आम्ही पाकिस्तानच्या किती जेटला हिट केलं, त्याचा नंबर आमच्याकडे आहे’, असं इंडियन एअर फोर्सचे DGAO एअर मार्शल एके भारती म्हणाले. भारताने पाकिस्तानच्या कुठल्या विमानाच नुकसान केलं, ते त्यांनी सांगितलं नाही. “मी एवढच म्हणीन की, ते हायटेक होतं. येणाऱ्या दिवसात तुम्हाला ते समजेलच. कारण अशा गोष्टी लपून राहत नाहीत” असं एअर मार्शल एके भारती म्हणाले.
‘भारताचा कुठलाही पायलट आमच्या ताब्यात नाहीय’
पाकिस्तानी सैन्याने आता भारताने त्यांच्या एका विमानाच नुकसान केल्याच कबूल केलं आहे. पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी प्रेस ब्रीफिंगमध्ये सांगितलं की, “भारतासोबतच्या संघर्षात पाकिस्तानच्या एका विमानाच थोडं नुकसान झालं आहे. त्यांनी विमानाबद्दल विस्तृत माहिती दिली नाही” सोबतच त्यांनी हे सुद्धा सांगितलं की, ‘भारताचा कुठलाही पायलट आमच्या ताब्यात नाहीय. या सर्व चुकीच्या बातम्या आहेत’