पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान पूर्ण उघडा पडला आहे. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची माहिती भारताच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) रविवारी पुराव्यांसह दिली. त्यानंतर पाकिस्तानकडून भ्रामक दावे करण्यात येत आहे. पाकिस्तानी हवाई दलाचे एअर व्हाईस मार्शल औरंगजेब यांनी हास्यास्पद दावा केला आहे. भारताचा विरोधात आमच्या हवाई दलाचा 6-0 असा विजय झाला, असे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर एअर व्हाईस मार्शल औरंगजेब सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहे. युजर त्यांच्या दाव्याला “हवाबाजी” म्हणत खिल्ली उडवत आहे.
भारताचे डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल राजीव घई यांनी रविवारी सांगितले की, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीची मागणी करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने आमच्याकडून शस्त्रसंधीची मागणी झाली नसल्याचा खोटा प्रचार सुरु केला. परंतु सीमेवर आम्हाला शांतता हवी असल्याचे त्यांनी म्हटले. बीबीसी उर्दूने दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्त लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ यांनी कोणताही भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नसल्याचे सांगितले. सोशल मीडियावर यासंदर्भात सुरु असलेले दावे अफवा आहे, असे त्यांनी म्हटले.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान विरोधात केवळ चार दिवसांत भारताला यश मिळाले. या चार दिवसांच्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी मारले गेले आहे. ही संख्या १०० पेक्षा जास्त आहे. त्यात पाच मोठ्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. सीमारेषेवर पाकिस्तानचे ४० जवान ठार झाले आहेत. तसेच पाकिस्तानच्या गोळीबारास तोफगोळ्यांनी उत्तर दिले जाणार असल्याचे भारताने म्हटले आहे.
भारताकडून मिळालेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून खोटे दावे आणि बातम्या पसरवल्या जात आहे. पाकिस्तान लष्करातील अधिकारी औरंगजेब यांनी म्हटले की, आम्ही भारताची लष्करी ठिकाणी लक्ष्य करुन उद्धवस्त केली आहे. पाकिस्तान हवाई दलाने भारतीय हवाई दलाचा 6-0 असा पराभव केला आहे. पाकिस्तान लष्कराच्या या दाव्यानंतर औरंगजेब यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.