भारत-पाकिस्तानमध्ये सीजफायर झाल्यानंतर बलूचिस्तानातील फायटर्सनी पाकिस्तान विरोधात मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तान एक ज्वालामुखीवर असलेला देश आहे. आम्ही त्याला नष्ट करु असं बलूच फायटर्सनी म्हटलं आहे. त्यांनी भारताकडे पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी मदत मागितली आहे. भारताकडून आम्हाला फक्त तीन गोष्टी मिळाल्या, तर आम्ही पाकिस्तानला संपवून टाकू असं BLA ने म्हटलय. द बलूचिस्तान पोस्टनुसार, भारत-पाकिस्तानमध्ये सीजफायर झाल्यानंतर बलूच फायटर्सनी एक स्टेटमेंट जारी केलय. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाळतो. त्यांच्यासोबत कूटनीतिक संबंध मूर्खपणा आहे असं बलूच फायटर्सनी सांगितलं. भारताने पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी मदत केली तर आम्ही पाकिस्तानला धडा शिकवू असं बलूच लिबरेशन आर्मीच म्हणणं आहे.
भारताकडून आम्हाला राजकीय, कूटनितीक आणि संरक्षण सहकार्य मिळालं, तर या आतंकिस्तान, पाकिस्तानला पूर्णपणे उद्ध्वस्त करुन टाकू, असं बीएलएने म्हटलय. बलूचिस्तानने जगातील अन्य देशांकडूनही मदत मागितली आहे. वेळेआधी पाकिस्तानला संपवलं नाही, तर ते जगासाठी धोकादायक ठरतील असं बलूच बंडखोरांच म्हणणं आहे. भारताने उद्या पाकिस्तानची तुकड्यांमध्ये विभागणी करण्याचा निर्णय घेतला, तर आम्ही सर्वप्रथम सहकार्य करु. असं बलूच लिबेरशन आर्मीच म्हणणं आहे. बलूच फायटर्सनुसार, या निर्णयानंतर तात्काळ त्यांचे लोक पाकिस्तानच्या पश्चिम सीमेला घेराव टाकतील.
बलूच लिबरेशन आर्मीने काय म्हटलय?
बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान सरकारला अल्टीमेटम दिला आहे. “तो दिवस आता दूर नाही, जेव्हा बलूच एक स्वतंत्र देश बनेल. असं होण्यापासून जगातील कुठलीही शक्ती रोखू शकत नाही” असा बलूच लिबेरशन आर्मीचा दावा आहे. “या कामाला जितका उशीर होईल, तितकाच रक्तपात होईल. आम्ही आमच्या उद्देशापासून मागे हटणार नाही” असं बीएलएने सांगितलय.
प्लान सुद्धा तयार
बलूच लिबरेशन आर्मीनुसार, पाकिस्तान अणवस्त्र सज्जतेच्या आडून दहशतवाद्यांना पाळतो. त्यांना प्रशिक्षण देतो. पाकिस्तानात हे उघडपणे सुरु आहे. पण त्यांना कोणी रोखत नाहीय. पाकिस्तानात फक्त आम्हीच हे संपवू शकतो, असं बीएलएच म्हणणं आहे. त्यासाठी संपूर्ण पाकिस्तान संपवावा लागेल. बीएलएने पाकिस्तानला संपवण्याचा प्लान सुद्धा बनवला आहे.