आज दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. दहावीच्या निकालानंतर आता पुढे अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरु होईल. दहावीनंतर चांगलं कॉलेज मिळाल्यावर पुढे खूप काही नवीन गोष्टी करायची संधी मिळते. अकरावीत तुम्हाला खूप काही शिकण्याची संधी असते, त्यामुळे अॅडमिशनसाठी तुम्हाला चांगले कॉलेज निवडण्याचा ऑप्शन असतो. अकरावीच्या अॅडमिशनची प्रोसेस काय असते जाणून घ्या.
अकरावी प्रवेश प्रक्रिया तारीख१९ मेपासून अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. १९ मे पासून तुम्ही ऑनलाइन अप्लाय करु शकतात. महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी पोर्टल सुरु करुन दिले आहे. आज निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी रजिस्ट्रेशन करु शकतात. यासाठी १०० रुपये फी भरावी लागणार आहे.
११ वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस (11th FYJC Admission Registration Process)१. वेबसाइटला भेट द्या
सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत [11thadmission.org.in](https://11thadmission.org.in/)वर जायचे आहे.
यानंतर तुम्हाला तुमचे रहिवासी ठिकाणी निवडायचे आहे. (मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक)
२. नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन
होमपेजवर तुम्हाला New Registration हा पर्याय दिसेल.
यात तुम्हाला तुमची सर्व भरायची आहे. यामध्ये नाव, मोबाईल नंबर, ईमेल ही वैयक्तिक माहिती भरायची आहे.
यानंतर तुमचा १०वीचा सीट नंबर, वर्ष, बोर्ड ही माहिती भरायची आहे.
यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्याची उत्तरे द्या. यानंतर एक पासवर्ड ठेवून रजिस्ट्रशेन करा.
३. लॉग इन आयडी तयार
यानंतर फॉर्म सबमिट केल्यावर तुमचा आणि अॅप्लिकेशन नंबर तयार होईल. हा नंबर तुमच्याजवळ ठेवा.
४. फॉर्म १ भरा (11th Admission Form 1)
यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवर जाऊन लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे.
यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल. त्याची उत्तरे द्या.
तुम्हाला तुमचा पत्ता, पालकांचे फोन नंबर,व्यवसाय याबाबत माहिती द्यायची आहे.
यानंतर तुम्हाला SC/ST/OBC/EWS कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे.
५. कागदपत्रे अपलोड करा
यानंतर तुम्हाला दहावीचे मार्कशीट, रहिवासी पुरावा, जात प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साइज फोटो अपलोड करावा लागेल.
यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि ट्रान्सफर सर्टिफिकेटदेखील अपलोड करावे लागेल.
६.रजिस्ट्रेशन फी भरा
यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फी भरायची आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने ती भरु शकतात.
7. फॉर्म २ भरा
यानंतर तुम्ही फॉर्म १ भरल्यानंतर तो फॉर्म लॉक करा.
यानंतर पुन्हा एकदा लॉग इन केल्यावर तुमचे रहिवासी ठिकाण टाका.
यानंतर तुम्हाला तुमच्या आवडत्या कॉलेजची यादी विचारली जाईल. तुम्हाला जे कॉलेज हवे आहे त्याी यादी टाका.
यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे.
८. मेरिट लिस्ट
यानंतर मेरिट लिस्ट जाहीर केली जाणार आहे. एकूण ३-४ मेरिट लिस्ट जाहीर केल्या जाणार आहे.
यानंतर तुम्हाला कॉलेज लागेल. जर तुम्हाला पहिल्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकाचे कॉलेज लागले तर तुम्हाला अॅडमिशन घ्यावे लागेल.
जर तुम्हाला जे कॉलेज लागले आहे त्यासाठी तुम्हाला अॅडमिशन घ्यायचे नसेल तर तुम्ही पुन्हा फॉर्म भरु शकतात.
अकरावीच्या अॅडमिशनच्या तारखा (11th Admission Dates)
अकरावी अॅडमिशन प्रक्रिया- मे २०२५
अकरावी अॅडमिशन पार्ट १ फॉर्म लास्ट डेट- जून २०२५
मेरिट लिस्ट- जून २०२५
अकरावीच्या अॅडमिशनचा पहिला राउंड- जुलै २०२५