Biometric e-Passport Service : आता भारतीयांसाठी परदेशातील प्रवास आणखी सोपा आणि सुरक्षित होणार आहे. कारण आता भारतीयांसाठी चिप-आधारित बायोमेट्रिक ई-पासपोर्ट सादर करण्यात आले आहे. या नवीन सुविधेसह भारत आता अमेरिका, कॅनडा, जपान, फ्रान्स आणि यूके सारख्या १२० हून अधिक देशांच्या यादीत सामील झाला आहे. जिथे हे तंत्रज्ञान आधीच वापरले जात आहे. ई-पासपोर्टमुळे इमिग्रेशन प्रक्रिया जलद आणि संपर्करहित होणार असून ओळखीची फसवणूकदेखील रोखण्यास मदत होईल. ई-पासपोर्ट म्हणजे काय आणि त्याचे वैशिष्ट्ये काय?पासपोर्ट सेवा कार्यक्रम २.० अंतर्गत एप्रिल २०२४ पासून भारतात ई-पासपोर्ट सुरू केला जाईल. पहिल्या टप्प्यात, नागपूर, भुवनेश्वर, जम्मू, गोवा, शिमला, जयपूर, चेन्नई, हैदराबाद यासारख्या शहरांमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला होता आणि आता जून २०२५ पर्यंत त्याची पूर्ण अंमलबजावणी होईल.या नवीन ई-पासपोर्टमध्ये मागील कव्हरमध्ये एक RFID चिप आणि अँटेना एम्बेड केलेले आहे जे व्यक्तीची बायोमेट्रिक आणि वैयक्तिक माहिती जसे की नाव, जन्मतारीख, पासपोर्ट क्रमांक, चेहरा आणि बोटांचे ठसे एकाच ठिकाणी सुरक्षितपणे संग्रहित करते. हा डेटा बीएसी, पीए आणि ईएसी सारख्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार एन्क्रिप्ट केलेला आहे. प्रवाशांना सुविधाई-पासपोर्टद्वारे परदेशात प्रवास करणारे भारतीय नागरिक आता इमिग्रेशन चेकपॉइंट्सवर जलद, स्वयंचलित आणि संपर्करहित प्रक्रियेतून जाऊ शकतील. ई-गेट्समुळे लांब रांगांची गरज कमी होईल आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुरळीत होईल. भारताचा आता या देशांच्या यादीत सामावेशअमेरिका, कॅनडा, जपान, फ्रान्स, जर्मनी, यूके, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यांसारखे देश आधीच ई-पासपोर्ट वापरत आहेत. भारताच्या या पावलामुळे, आता भारतीय नागरिकांना त्या देशांमध्ये प्रवेश करताना अधिक आदर आणि सुविधा मिळेल. ई-पासपोर्टसाठी अर्ज कसा करावानागरिक पूर्वीप्रमाणेच पासपोर्ट सेवा पोर्टलवर अर्ज करू शकतात. त्यांना जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्राला भेट द्यावी लागेल आणि त्यांचे बायोमेट्रिक तपशील द्यावे लागतील. ही फक्त सुरुवात आहे. भविष्यात, डिजिटल व्हिसा, मोबाइल पासपोर्ट वॉलेट, आधार आणि डिजीलॉकर इंटिग्रेशन सारखी वैशिष्ट्ये जोडली जाऊ शकतात, ज्यामुळे प्रवास पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस होईल.