लवकरात लवकर अर्ज करा, 70 हजार रुपये पगार असणारी नोकरी मिळवा, कुठे कसा कारल अर्ज?
Marathi May 13, 2025 11:25 PM

जॉब न्यूज: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. आसाम लोकसेवा आयोगाने (APSC) जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती जाहिरात क्रमांक 18/2025अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट apsc.nic.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

दरम्यान दिलेल्या माहितीनुसार, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2025 आहे, तर फी जमा करण्याची शेवटची तारीख 9 जून 2025 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार येथे दिलेल्या चरणांद्वारे अर्ज करू शकतात.

कोणाला करता येणार अर्ज?

उमेदवार भारताचा नागरिक आणि आसामचा कायमचा रहिवासी असावा. अर्जासोबत रोजगार विनिमय प्रमाणपत्र किंवा कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. हा डिप्लोमा नियमित पद्धतीने करावा लागेल, दूरस्थ शिक्षण पदवी वैध राहणार नाही.

वयोमर्यादा किती?

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 297.20 रुपये, ओबीसी/एमओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 197.20 रुपये आणि एससी/एसटी/बीपीएल/पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना 47.20 रुपये भरावे लागतील.

निवडलेल्या उमेदवारांना किती मिळणार पगार?

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 14000 ते 70000 रुपये पगार आणि 8700 रुपये ग्रेड पे मिळेल. याशिवाय, आसाम सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते देखील दिले जातील. हा पगार पे बँड-2 अंतर्गत दिला जाईल, ज्यामुळे एकूण पगार खूपच प्रभावी ठरतो.

कसा कराल अर्ज?

सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट apsc.nic.in ला भेट द्यावी.
होमपेजवरील जेई मेकॅनिकल रिक्रूटमेंट 2025 लिंकवर क्लिक करा.
लॉग इन करून स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज भरा.
सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर, शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
फॉर्म डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

दरम्यान, नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. कारण पदांसाठी पगार देखील चांगली मिळणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांना 9 जून पर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यामुळं जे उमेदवार पात्र आहेत, त्यांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

आयआयटीपेक्षा जास्त पगार! घरकाम करणाऱ्यांसाठी 83 लाखांचं पॅकेज, ‘या’ कंपनीनं प्रसिद्ध केली जाहीरात

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.