Maharashtra Live Update : भाजपची आजपासून देशभरात तिरंगा यात्रा
Sarkarnama May 13, 2025 06:45 PM
J&K Terrorist : तीन संशयीत दहशतवाद्यांची छायाचित्र प्रसिद्ध

पहलगाम हल्ल्यातील तीन संशयीत दहशतवाद्यांची छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. जम्मू -काश्मीर परिसरात अनेक ठिकाणी ही छायाचित्र लावण्यात आली आहेत. त्यांचा पत्ता देणाऱ्या व्यक्तीला 20 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

SSC Result 2025 Declared: दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे. हावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. यंदाही कोकणाचा निकाल सर्वाधिक लागला आहे.

Shopian Encounter live:सुरक्षा बलाच्या जवानांनी चार अतिरेक्यांना घेरलं

जम्मू-कश्मीरमधीस शोपियान मध्ये आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा बलाच्या जवानांमध्ये गोळीबार झाला. सुरक्षा बलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं आहे. येथे मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु आहे. चार दहशतवाद्यांना घेरले आहे, एका दहशतवाद्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

BJP Tiranga Yatra :23 मेपर्यंत तिरंगा यात्रा

दहशतवादाविरोधात भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरल्यानंतर या ऑपरेशनची माहिती देशभरात पोहोचवण्यासाठी भाजपकडून आज देशभर तिरंगा यात्रा काढली जाणार आहे. आजपासून 23 मेपर्यंत भाजपचीही तिरंगा यात्रा आहे.

ShivsenaUBT Live: माजी नगरसेविका घोसाळकर यांचा राजीनामा

ठाकरे कुटुंबाच्या निकटवर्तीय असलेल्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे उत्तर मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Nitin Gadkari : सहकारातील चांगल्या संस्थांना स्वायत्तता द्यावी; नितीन गडकरी यांची मागणी

शिक्षण क्षेत्रात ज्याप्रमाणे चांगल्या सक्षम शिक्षण संस्थांना सरकारने स्वायत्तता दिलेली आहे, त्याचप्रमाणए सहकारातही चांगल्या सक्षम संस्थांना स्वायत्तता द्यावी. फक्त चांगला कारभार नसलेल्या संस्थांवरच राज्य सकराने नियंत्रण ठेवावे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली.

Eknath Shinde : शेती कर्जमाफीवर एकनाथ शिंदेंचे पुन्हा मोठं विधान

आपण दिलेले वचन पूर्ण करणार, असे म्हणत, शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत आपण वचनबद्ध असल्याचे म्हटलं. महायुती सरकारमध्ये शेतकरी कर्जमाफीवरून विरोधास असणारी विधानं समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी आता तरी शक्य नसल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी कर्जमाफीवर बोलायला तयार नाहीत.

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या नावाने परीक्षा पुढे ढकलल्याचे खोटे परिपत्रक व्हायरल

मुंबई विद्यापीठाच्या नावाने युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव 14 मे पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असे नमूद करून परिपत्रक समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहे. मात्र, परीक्षेसंदर्भातील हे परिपत्रक बनावट असल्याचे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

Maharashtra Rain Update : मराठवाड्यात अवकाळी पावसाचा कहर;वीज पडून 6 जणांचा मृत्यू, तर 14 जनावरे दगावली

अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीचा फटका मराठवाड्यातील अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसह फळबागांना बसला आहे. मराठवाड्यात वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला, तर 14 जनावरे देखील दगावली आहेत. मे महिन्यांत 7 दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली.

CM Devendra Fadnavis : सहकार कायद्यातील बदलासाठी समितीची स्थापना करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

वित्तीय संस्था, कृषी प्रक्रिया संस्था अशा प्रत्येक क्षेत्राशी निगडित सहकारी संस्थांसाठी त्यांच्या निकडीवर कायद्यात नवीन प्रकरणे तयार करणे आणि कायद्यात बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी समिती तयार करून कायद्यात आवश्यक ते बदल केले जातील, अशी घोषणा महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Beed Crime Update : परळीच्या फड गँगवर मकोका अंतर्गत कारवाई

बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आणखी एका टोळीविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई केली. परळीतील फड गँगविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसातील परळीतील घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना पोलिस अधीक्षकांनी कायद्याच्या मार्गानं दणका देत आहेत.

CA Exam : सीए फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर ca exam

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढे ढकललेल्या सीए परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. आता या परीक्षा 16 ते 24 मेदरम्यान घेतल्या जाणार आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाल्याने सीए फायनल आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

Pratap Sarnaik : राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती; प्रताप सरनाईक यांची माहिती

राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून याबाबतच्या ठरावाला महामंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव आता सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

Cyber attacks : 'ऑपरेशन सिंदूर' नंतर सीमेपलीकडून सायबर हल्ले तीव्र

सीमेपलीकडून होणारे सायबर हल्ले 'ऑपरेशन सिंदूर' नंतर अधिक तीव्र झाले आहेत. या कालावधीत एकूण 15 लाख सायबर हल्ल्याचे प्रयत्न पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियातील हॅकर टोळ्यांनी केले असून, त्यातील फक्त 150 हल्ले यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे. या कटाच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक तपास सुरू असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.