Operation Sindoor : भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची सध्या जगभरात चर्चा होत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारताने आपले लष्करी सामर्थ्य संपूर्ण जगाला दाखवले आहे. विशेष म्हणजे भारताच्या या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे आर्थिक तसेच सामरिक नुकसान झाले आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर राबवताना भारताच्या तिन्ही दलाने आपले शौर्य दाखवले. त्यामुळे हे ऑपरेशन नेमके कसे राबवण्यात आले. भारताच्या लष्कराने पाकिस्तावर कशी कारवाई केली हे नेमके जाणून घेऊ या…
>>> ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आखण्यात आलेला हेतू साध्य करण्यासाठी भारतीय लष्कराने अत्यंत खुबीने नियोजन आखले होते. हे ऑपरेशन राबवताना लष्कराने सर्वप्रथम एकूण 9 दहळतवादी तळांना लक्ष्य केलं. या हल्ल्यांत भारताने 9 तळांवर मिसाईल्स डागल्या. यात चार दहशतवादी तळ हे पाकिस्तानच्या हद्दीत (बहावलपूर, मुरीदके) हेते. तर उर्वरीत पाच दहशतवादी तळ हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये (उदा. मुझफ्फराबाद, कोटली) होते. लष्कराने ज्या ठिकाणांवर हल्ला केला होता यातील काही ठिकाणं हे जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा, यांची मुख्य तळं होती. या दोन्ही संघटना 2019 सालच्या पुलवामा आणि 2008 सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार होत्या.
>>> भारताच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही भारताच्या लष्करी तळांवर तसेच नागरी वस्त्यांवर ड्रोन हल्ले तसेच मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न केला. 7, 8 आणि 9 मे 2025 या तीन दिवसांत पाकिस्तानने ही कुरापत केली. पाकिस्तानच्या या हल्ल्यांना अयशस्वी करण्यासाठी भारतीय लष्कराने कमिकाझ ड्रोन तैनात केले. या ड्रोनच्या मदतीने भारताने पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टिम निकामी करण्याचं काम केलं.
>>> विशेष म्हणजे भारतीय लष्कराने पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले यशस्वीरीत्या परतवून लावले. भारतीय लष्कराच्या सजगतेमुळे भारताची कमीत कमी आर्थिक तसेच जीवितहानी झाली. भारताच्या या कारवाईतून पाकिस्तानची HQ-9 एअर डिफेन्स सिस्टिम किती कमकुवत आहे, हेही समोर आले. भारताने 9 आणि 10 मे रोजी पाकिस्तानच्या हवाई तळांवर यशस्वीरित्या हल्ले करून नवा इतिहास रचला.
>>> पाकिस्तानच्या हल्ल्यांनंतर भारताने अवघ्या तीन तासांत पाकिस्तानच्या एकूण 11 लष्करी तळांना लक्ष्य केलं. यात नूर खान, रफिकी, मुरीद, सुक्कूर, सियालकोट, पसरूर, चुनियन, सरगोढा, साकर्ड, भोलारी, जकोबाबाद यांचा समावेश होता.
>>> भारताने हे हल्ले करून थेट सॅटेलाईट ईमेज प्रदर्शित केल्या. जकोबाबाद येथील शाहबाज हवाई तळाचे हे फोटो होते. या फोटोंकडे पाहून लष्कराने केलेल्या कामगिरीची प्रचिती येते. पाकिस्तानने सरगोधा आणि भोलारी यासारख्या हवाई तळांवर एफ-16 आणि एफ-17 यासारखी लढाऊ जेट ठेवली होती. भारताच्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी हवाई दलाच्या जवळपास 20 टक्के पायाभूत सुविधा नेस्तनाबूत झाल्या होत्या.
>>> भोलारी हवाई तळावरील भारताच्या पाकिस्तानचे जवळापास 50 सैनिक ठार झाले. यात स्क्वॉडर्न लिडर उस्मान युसूफ तसेच 4 अधिकाऱ्यांचा समावेश होता. याच हल्ल्यात पाकिस्तानच्या काही फायटर जेटचेही नुकसान झाले.