टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधी इंग्लंड वेस्ट इंडिज विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे. हॅरी ब्रूक या दोन्ही मालिकेत इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. ब्रूकची दोन्ही फॉर्मेटमध्ये कॅप्टन्सी करण्याची पहिलीच वेळ असणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील निराशाजनक कामगिरीनंतर जोस बटलर याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हॅरी ब्रूक याची कर्णधारपदी निवड करण्यात आली. तसेच टी 20i मालिकेसाठी अशा एका खेळाडूला संधी देण्यात आलीय, ज्याने गेल्या 3 वर्षात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाहीय.
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात 29 मे ते 3 जून दरम्यान एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. तर त्यानंतर उभयसंघात टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. टी 20i मालिकेसाठी इंग्लंड संघात स्पिन ऑलराउंडर लियाम डॉसन याला संधी देण्यात आली आहे. लियाम डॉसन याने 2016 साली इंग्लंडसाठी तिन्ही प्रकारात पदार्पण केलं होतं. मात्र डॉसनला नोव्हेंबर 2022 नंतर एकदाही संधी मिळाली नाही. मात्र डॉसन देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत राहिला. डॉसनने अखेरचा टी 20 सामना साऊथ आफ्रिका टी 20 लीगमध्ये खेळला होता. त्यानंतर आता डॉसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.
लियाम डॉसन याने इंग्लंडचं 3 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 11 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. लियामने कसोटीत 84 धावा करण्यासह 7 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच वनडेत 63 रन्स आणि 5 विकेट्स घेतल्यात. तर टी 20i मध्ये लियामने 57 रन्स करण्यासह 6 खेळाडूंना मैदानाबाहेरचा रस्ताही दाखवला आहे.
वनडे टीम: हॅरी ब्रूक (कर्णधार), जो रूट, टॉम बँटन, जॅकब बेथेल, जोस बटलर, ब्रायडन कार्से, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, साकिब महमूद, जेमी ओवरटन, मॅथ्यू पॉट्स, आदिल राशिद, जोफ्रा आर्चर, गस एटकिंसन आणि जेमी स्मिथ.
टी20 टीम: हॅरी ब्रूक (कॅप्टन), जॅकब बेथेल, जोस बटलर, ब्रायडन कार्स, रेहान अहमद, टॉम बँटन, लियाम डॉसन, साकिब महमूद, जेमी ओव्हरटन, मॅथ्यू पॉट्स, आदिल राशिद, फिल साल्ट, ल्यूक वुड, बेन डकेट आणि विल जॅक्स.