Weekend Special Recipe: विकेंडला स्पेशल बनवायचे असेल तर नाश्त्यात बनवा नो मैदा पिझ्झा, नोट करा रेसिपी
esakal May 17, 2025 02:45 PM

How to make no maida pizza at home for weekend breakfast: प्रत्येकाला विकेंडला खास नाश्ता हवा असतो. बाहेरचा पिझ्जा खायचा नसेल तर घरच्या घरी नो मैदा पिझ्झा तयार करू शकता. नो मैदा पिझ्झा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

नो मैदा पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

हिरवी, लाल, पिवळी शिमला मिरची

पनीर

लाल तिखट

पीठ

कांदा

चिली फ्लेक्स

तेल

मीठ

नो मैदा पिझ्झा बनवण्याची कृती

नो मैदा पिझ्झा बनवण्यासाठी सर्वात आधी लाल, पिवळी आणि हिरवी शिमला मिरची उभी बारिक कापून घ्यावी. नंतर पनीरचे चौकोणी तुकडे करावे. एका पॅनमध्ये पनीरचे तुकडे आणि शिमला मिरची फ्राय करा. नंतर पोळी लाटा आणि चिझ टाका. नंतर भाजून घ्या. नंतर त्यावर मायो, पिझ्झा सॉस पसरवा. नंतर त्यावर चिलि फ्लेक्स टाका. त्यावर शिमला मिरची, कांदा टाकून बेक करा. नो मैदा पिझ्झा तयार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.