Premanand Maharaj Advise to Virat Kohli : कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय ऑलराऊंडर विराट कोहली याने पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासह प्रेमानंद महाराज यांचा आश्रम गाठला. मंगळवारी तो प्रेमानंद महाराज यांचा सल्ला घेण्यासाठी गेला. या दरम्यान त्याने जवळपास दोन तास त्यांच्याशी हितगुज केले. यापूर्वी सुद्धा तो पत्नीसह अनेकदा त्यांच्या दर्शनाला गेला आहे. या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे विराट कोहली हा कसोटीतील निवृत्तीचा निर्णय मागे घेईल का, अशी चर्चा रंगली आहे.
चाहत्यांची मागणी काय?
Virat Kohli याच्या निवृत्तीच्या निर्णयाने सोशल मीडियावर एकच हंगामा सुरू आहे. त्याच्या चाहत्यांनी हा निर्णय दबावाखाली घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विराट कोहली याने तातडीने प्रेमानंद महाराजांचा आश्रम जवळ केला. तो महाराजांचा भक्त आहे. दरम्यान सोशल मीडियावर अनेक जणांनी आता थेट महाराजांना साकडे घातले आहे. “गुरूजी, विराट याला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी सांगा”, तर एका युझरने, “भावा, 10 हजार धावा करण्याच्या आश्वासनाचे झाले काय?” असा सवाल विचारला आहे.
एका युझरने कमेंट केली आहे की, विराटने जशी कसोटी निवृत्तीची घोषणा केली. त्यावेळी असे वाटले की जणू क्रिकेट विश्वातील एक चांगला अध्याय संपला आहे. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर विराट आणि अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी वृदांवन येथे पोहचले. यापूर्वी 2023 च्या वर्षाला आणि या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात हे दाम्पत्य महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहचले होते.
विराटची कसोटी सामन्यातून निवृत्ती
विराट कोहली याने 12 मे रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. विराट कोहलीचे कसोटी करिअर जवळपास 14 वर्षांचे आहे. या दरम्यान त्याने 123 टेस्ट मॅचमध्ये 210 सामने खेळले. त्याने 30 शतके, 31 अर्धशतकांच्या मदतीने 9230 धावा केल्या. 36 वर्षीय विराटने यावर्षी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी सामना खेळला. ही कसोटी भारताला गमवावी लागली होती. त्यात भारताला विजय मिळवता आला नाही.