टिव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झाले आहे. 'राजा राणीची गं जोडी' (Raja Rani Chi Jodi ) फेम मराठी अभिनेत्री श्रुती अत्रेने (Shruti Atre) नुकतेच 'मदर्स डे' आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती आणि आता तिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
अभिनेत्री अत्रेने नुकतीच आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याची खास पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने या पोस्टला एक हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "आमचे घर अधिक आवाज करणारे आणि handsome झाले आहे..." सध्या तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री श्रुतीला 12 मे 2025 ला मुलगा झाला आहे. श्रुती आणि आश्विन आता -बाबा झाले आहेत. त्याच्या आयुष्यातील खास टप्प्याला आता सुरूवात झाली आहे.
श्रुती अत्रे पोस्टलोकप्रिय अभिनेत्री श्रुती अत्रेने 'मदर्स डे'च्या निमित्ताने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. श्रुतीने बेबी बंप फ्लॉन्ट करत नवऱ्यासोबत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने खूपच भावनिक कॅप्शन दिलं होते. तिने लिहिलं की, "हा वेगळा आहे. आमचे कुटुंब आता मोठ होणार आहे. ही सर्वात सुंदर बातमी शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. प्रवास सोपा नव्हता...गुंतागुंत होती, अश्रू होते आणि भीतीचे क्षण होते. पण या सर्वांमध्ये खूप प्रेम होते...या काळात माझे कुटुंब माझ्या पाठीशी उभे राहिले. प्रत्येक आईला आणि लवकरच आई होणाऱ्या महिलेला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!"
श्रुती अत्रेला 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने राजश्री ढाले पाटील अशी खलनायिकाची भूमिका साकारली होती. यानंतर श्रुती अत्रेला हिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.