शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांनी स्वराज्याच्या सीमा उत्तरेत दिल्ली व दक्षिणेत गोव्यापर्यंत वाढवल्या.
“सागरावर ज्यांचे वर्चस्व, त्यांच्या सीमा यमुना पार जातात.” – शिवाजी महाराज. हेच विचार शंभुराजांच्या डोळ्यासमोर होते.
शंभुराजांनी बाणकोट, जैतापूर, राजापूर, डिचोली येथे जहाजबांधणी केंद्रे सुरू केली. सागरी संरक्षणासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला.
औरंगजेबाच्या स्वारीदरम्यान पोर्तुगीज खूपच उत्साही झाले. त्यांना धडा शिकवण्यासाठी शंभूराजांनी गोव्यावर मोहीम आखली.
पोर्तुगीजांनी मर्दनगड (सेंट स्टिफनचा किल्ला) वेढला. ४० मराठे किल्ल्यात असतानाही त्यांनी तग धरला. शेतीचे बांध फोडून आजूबाजूला पाणी केले.
३०० मावळ्यांची दुसरी तुकडी किल्ल्यात दाखल झाली आणि संभाजीराजे स्वतः येऊन धडकले. गोळीबार सुरू झाला.
व्हाईसरॉय अलव्होर पळून गेला. शंभूराजांनी त्याचा पाठलाग केला, पण पावसामुळे घोडा वाहून गेला. खंडो बल्लालांनी घोडा वाचवला.
या लढाईत कृष्णाजी कंक वीरमरण पावले. शंभूराजांनी त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाला किताब दिला आणि सरदारकी बहाल केली.
ही स्वारी यशस्वी झाली असती तर, गोवा प्रांत महाराष्ट्रात समाविष्ट झाला असता, असं अनेक इतिहासकार मानतात.