मुंबईत ३ दिवसांत बॉम्बस्फोट होईल! ईमेलद्वारे मिळाली धमकी
Webdunia Marathi May 14, 2025 05:45 PM

Mumbai News: नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे महाराष्ट्र पोलीसही सतर्क झाले आहे. या काळात मुंबई पोलिसांना धमकीचे ईमेल येत आहे ज्यात मुंबई बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, येत्या तीन दिवसांत मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देणारा एक ई-मेल आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हा ईमेल मुंबई पोलिसांना पाठवण्यात आला आहे आणि सायबर पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. मुंबई पोलिसांना सतर्क ठेवण्यात आले आहे, परंतु अधिकाऱ्यांनी नागरिकांना घाबरू नका असे आवाहन केले आहे.

सोमवारी राज्य पोलिसांनी मुंबई पोलिसांना हा ई-मेल कळवळा, त्यानंतर सर्व सुरक्षा एजन्सींना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सोमवारी ममता बोरसे नावाच्या ईमेल आयडीवरून हा धमकीचा ईमेल पाठवण्यात आला. महाराष्ट्र पोलिसांनी तात्काळ मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. ऑपरेशन सिंदूरनंतर मुंबई पोलिस आधीच हाय अलर्टवर आहे. या ई-मेलनंतर, ही माहिती दक्षिण सायबर पोलिसांना देण्यात आली आहे आणि ते या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

Edited By- Dhanashri Naik
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.