भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) मागील महिन्यात वार्षिक करार जाहीर केले आणि त्यात रोहित शर्मा, , जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा यांना A+ ग्रेडमध्ये ठेवले होते. जे खेळाडू भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये खेळतात त्यांना या ग्रेडमध्ये करार दिला जातो. पण, रोहित शर्मा व विराट कोहली यांनी मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून, तर काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे ते आता फक्त वन डे क्रिकेट खेळणार आहे. अशात या दोघांचा A+ ग्रेड कायम राहणार आहे का? यावर BCCI ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
७ मे २०२५ मध्ये कसोटीतून निवृत्ती जाहीर करणाऱ्या ने ६७ कसोटी सामन्यांत ४०.५७ च्या सरासरीने १२ शतकांसह ४३०१ धावा केल्या आहेत. विराटने १२३ कसोटीत ४६.८५ च्या सरासरीने ३० शतकांसह ९२३० धावा केल्या. २०२७ च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही सीनियर खेळाडूंना खेळायचे आहे. मग, जेव्हा तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूलाच A+ ग्रेड दिला जातो, तर मग रोहित व विराट यांना तो का दिला गेला आहे?
ग्रेड अ+ : दरवर्षी ७ कोटी
श्रेणी अ : दरवर्षी ५ कोटी
ग्रेड ब : दरवर्षी ३ कोटी
ग्रेड क : दरवर्षी १ कोटी
पात्रता निकष: केंद्रीय करारासाठी पात्र होण्यासाठी, खेळाडूने किमान ३ कसोटी सामने, ८ वन डे किंवा १० ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले असणे आवश्यक आहे.
BCCI ने जाहीर केलेला करार १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत या कालावधीचा आहे. या कालावधीत विराट आणि रोहित तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले होते. त्यामुळे ते सध्याच्या करारात कायम राहतील. पण १ ऑक्टोबर २०२५ नंतरच्या करारात मात्र विराट आणि रोहितच्या श्रेणीत बदल होऊ शकतो किंवा त्यांना करार मिळणार की नाही, यावरही प्रश्नचिन्ह असेल.
बीसीसीआयचं म्हणणं काय?BCCI चे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, या दोघांनी ट्वेंटी-२० व कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी ते A+ ग्रेडमध्ये कायम राहतील. ते अजूनही भारतीय संघाचा भाग आहेत आणि त्यांना A+ ग्रेडच्या सर्व सुविधा मिळणार.