वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज फेडरेशन (FWICE) ने तुर्कीला शूटिंग लोकेशन म्हणून निवडण्यापासून टाळण्याची विनंती केलीय. भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेला आव्हान देणाऱ्या कोणत्याही देशात भारतीय चित्रपट उद्योगाने गुंतवणूक करू नये. जेव्हा तुर्की आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने पाकिस्तानच्या बाजूने उभी राहत आहे, तेव्हा भारतातील चित्रपट निर्मात्यांनी तुर्कीत जाऊन चित्रिकरण करण्याचे टाळावे. तुर्कीची भूमिका केवळ राजनैतिक पातळीवरच नव्हे तर विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताच्या विरोधात राहिली आहे.
Balochistan : आम्ही स्वतंत्र, दिल्लीत उच्चायुक्त सुरू करण्यात यावं, बलुचिस्तानची खळबळजनक मागणीएकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू असताना दुसरीकडे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली आहे. बलोच नेता मीर यार बलोच याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा करत पाकिस्तानपासून स्वातंत्र झाल्याची घोषणा केली. दिल्लीमध्ये बलुचिस्तानचे स्वतंत्र उच्चायुक्त सुरू करण्यात यावं अशी मागणी त्याने भारताकडे केली आहे.
Mahayuti News : जनजागृतीसाठी करण्यात आले रॅलीचे आयोजनऑगस्ट क्रांती मैदानात महायुतीची तिरंगा रॅली काढण्यात आली. बुधवारी महायुती सरकारकडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जनजागृतीसाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या तिरंगा रॅलीत महायुतीचे अनेक नेते सहभागी झाले होते.
Harshvrdhan Sapkal : राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चामहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती दिली. शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. मी अध्यक्ष झाल्यानंतर त्याची भेट घेतली नव्हती असे सपकाळ म्हणाले. अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या संदर्भात काही चर्चा झाली नाही. प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत काय सुरु आहे हे मला माहीत नाही असेही सपकाळ म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरनंतर सैन्याचा आणखी एक तडाखा : ऑपरेशन केल्लरऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन केल्लर लाँच केले आहे. यात आतापर्यंत तीन अतिरेक्यांना ठार मारण्यात आले असून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणारमहापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे, ते नाशिकमध्ये बोलत होते.
Mumbai live: फडणवीस, शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील पहिली मेट्रो धावलीठाण्यात एमएमआरडीएकडून मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याची चाचणी आज करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याचे जवळपास 96 % काम पूर्ण झाले आहे. पहिला टप्पा 4.4 की मी लांबीचा अजून दहिसर पूर्व ते काशिगाव हा पहिला टप्पा असणार आहे. मेट्रो नऊ मध्ये एकूण 8 स्थानक असणार आहेत.
CJI BR Gavai: देशातील सर्वोच्च पदाचा मान दुसऱ्यांदा अमरावतीलासर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून आज राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी भूषण गवई यांनी शपथ घेतली. भूषण गवई हे मुळचे अमरावतीचे आहे. देशातील सर्वोच्च पदाचा मान दुसऱ्यांदा अमरावतीला मिळाला आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील याही अमरावतीच्या आहेत. भूषण गवई यांनी शपथ घेतातच अमरावतीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात अमरावतीकरांनी फटाक्याची आतषबाजी करत एकमेकांना लड्डू वाटप करत जल्लोष केला.
India on China : भारतानं चीनला पुन्हा ठणकावलंपहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. आता दुसरीकडे चीननं अरुणाचल प्रदेशात डोकं वर काढल्याचं दिसते. चीनकडून अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुरु झाला आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठककेंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या उपस्थितीत सीसीएसची बैठक होत आहे. बैठकीला तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
भारताचा चीनला दणका, ग्लोबल टाईम्स ट्विटर खाते बंदचीनचा प्रचार करणार ग्लोबल टाइम्स हे ट्विटर खाते भारतात बंद करण्याचा भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याच ट्विटर खात्याच्या मार्फत पसरवला जात होता चिनी प्रपोगंडा.ग्लोबल टाईम्स हे चीन सरकारच मुखपत्र आहे.
बाबासाहेबांच्या वारसांच्या जमिनीवर कब्जाडोंबिवली जवळील डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या जमिनीवर भूमाफियांनी कब्जा केला आहे. या जमिनीवर सात मजली इमारत बांधण्यात आली आहे. 2023 साली अनधिकृत घोषित केलेल्या या इमारतीवर 20 मे रोजी कारवाई केली जाणार असून ही इमारत जमीनदोस्त केली जाणार आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली
भूषण गवई यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथभारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या गवई यांना शपथ दिली. या शपथविधीसाठी भूषण गवई यांच्या आई आणि परिवार उपस्थित होता.
रुग्णसेवेत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह 11 कर्मचाऱ्यांवर कारवाईसोलापूर येथील शासकीय रुग्णालयाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह 11 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांनी ही कारवाई केली आहे. रुग्णालयातील ओपीडी , आयपीडीला अचानकपणे भेट देत कामात निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करत शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना बाहेरची औषधे लिहून दिल्यास संबंधित डॉक्टर कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून प्रवाशांसाठी WI-FI सुविधामध्य रेल्वेच्या पुणे विभागाने आता तब्बल 79 रेल्वे स्थानकांवर मोफत WI-FI सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुणे विभागातील महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांना ही सुविधा रेल्वेकडून पुरवण्यात येत आहे.
भूषण गवई घेणार सरन्यायाधीशपदाची शपथभारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई आज शपथ घेणार आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या गवई यांना शपथ देतील. या शपथविधीसाठी भूषण गवई यांच्या आई आणि परिवार उपस्थित राहणार आहे.
Nashik : युद्धाच्या काळात पाकिस्तानमधील वेबसाईटवर सर्च करणाऱ्याला अटकभारत-पाकिस्तानमधील युद्धाच्या काळात पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकाने नाशिकच्या मालेगावमधील एका 45 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतलं. या व्यक्तीची जवळपास सहा तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.
आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णयआंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने मोठं पाऊलं उचललं आहे. राज्य सरकारने आता आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः पोलिस आयुक्तांकडे सोपवली आहे. त्यामुळे असे विवाह करणाऱ्या जोडप्यांचे अनुदान बंद केल्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारने महत्वाचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
Jammu Kashmir : काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मंजूर नाही - परराष्ट्र मंत्रालयकाश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मंजूर नाही, असं म्हणत भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पाकिस्तानसह अमेरिकेला सुनावलं आहे. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणतेही प्रश्न भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीने सोडवले अशी आमची दीर्घकाळापासूनची राष्ट्रीय भूमिका असल्याचही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे या धोरणात आताही कोणताही बदल झालेला नसून उलट पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेल्या भारतीय भूभाग रिकामी करावा हा प्रलंबित मुद्दा आहे, असंही जयस्वाल यांनी म्हटलं आहे.
Operation Sindoor : मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकजगभरात गाजलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी सीसीएसची बैठक होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.