टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचा घटक असतो, जो रक्त पातळ ठेवण्यास मदत करतो आणि गाठी होण्याचा धोका कमी करतो.
टोमॅटो खाल्ल्याने रक्तसंचार सुरळीत राहतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
टोमॅटोमध्ये असणारे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
रक्त जाड झाल्यास शरीरात गुठळ्या होऊ शकतात. टोमॅटोचे सेवन केल्याने गुठळ्या होण्याची शक्यता कमी होते.
टोमॅटोमधील अँटी-ऑक्सिडंट्स पेशींचे नुकसान रोखण्यास मदत करतात आणि शरीरात दुषित घटकांचा प्रभाव कमी करतात.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन C, K, A, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते – जे शरीरासाठी आवश्यक आहेत.
टोमॅटो सूप, पराठा, कोशिंबीर, रस्सा – कुठल्याही प्रकारात टोमॅटो घेतल्यास आरोग्यास फायदा होतो.
टोमॅटो शक्यतो शिजवून किंवा सूपच्या स्वरूपात घेतल्यास लायकोपिनचे शोषण अधिक चांगले होते!