नवी मुंबई, ता. १४ : ऐरोली येथील ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या चार्टर्ड इंग्रजी शाळेने दहावीच्या परीक्षेत यश मिळवले. शाळेत सृष्टी उपाध्याय हिने ९५.८० टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकाविला; तर स्वाती कनोजिया ९४ टक्के व डिंपल चौधरी ९२.८० गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. मराठी माध्यमातून साई भिलारे ९०.८०, वेदांत सोनवणे ९०.४० टक्के; तर प्रीतम जाधव याने ९०.२० टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, उपाध्यक्ष गौरी मोकाशी व सचिव नांदुगडे, सर्व पदाधिकारी, तसेच माध्यमिक विभागाच्या निवृत्त मुख्याध्यापिका गोसावी, मुख्याध्यापिका भारती रुळे व नंदू सावंत यांनी अभिनंदन केले.