शहापूर (वार्ताहर) : माध्यमिक शालांत परीक्षेत शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील न्यू स्टॅन्डर्ड इंग्लिश स्कूलचा १०० टक्के निकाल लागला. स्पर्श दोंदे ९४ टक्के गुण मिळवत प्रथम आला आहे. तर पूजा साबळे ८८.६० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर सनी सिंग, प्रणव बागूल यांनी ८५.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाले. स्कूलचे मुख्याध्यापक विवेक अशोक सिंग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.