किन्हवली (बातमीदार)ः शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात असलेल्या टेंभुर्ली येथील सह्याद्री विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे. नवव्या वर्षी दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रथा दळवीने ९४.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला. द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या संस्कृती चौधरी, वेदिका चौधरी ९१.६० टक्के इतके गुण मिळाले. तर प्रकाश राऊत, राज पोंढेकरने ९०.४० टक्के गुण मिळवले. तर अमोल भोईरला ९० टक्के गुण मिळाल्याने तो चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.