Dhadkan Re Release : "ना ना करते प्यार..."; अक्षय-शिल्पाचा 'धडकन' २५ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला, कुठे अन् कधी?
Saam TV May 15, 2025 03:45 PM

सध्या बॉलिवूडचे आयकॉनिक चित्रपट री-रिलीज होत आहेत. या चित्रपटांना री-रिलीजनंतर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशात आता शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) , सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar ) जबदस्त चित्रपट री-रिलीज होणार आहे. या चित्रपटाची आजही क्रेझ पाहायला मिळते. बॉलिवूडचा गाजलेला चित्रपट 'धडकन' (Dhadkan ) आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'धडकन' ची री-रिलीजची डेट जाहीर करण्यात आली आहे.

'' चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या चित्रपटाची गाणी कायम सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. उदा. 'दिल ने ये कहा है दिल से', 'अक्सर इस दुनिया में ', 'ना ना करते प्यार', 'दूल्हे का सेहरा सुहाना लगता है' आणि 'तुम की धडकन' चित्रपटातील त्रिकूट सुनील शेट्टी , शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारने आपल्या अभिनयाने चित्रपटाला चारचाँद लावले आहेत. 'धडकन' चित्रपट 2000 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

'धडकन' ही एक सुंदर प्रेमकथा आहे. या चित्रपटातील डायलॉग तर आजही प्रेक्षकांच्या बोलण्यात येतात. 'धडकन' चित्रपटाची च्या घोषणेनंतर चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'धडकन' चित्रपट 23 मे 2025ला पुन्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'धडकन' चित्रपटात शिल्पा शेट्टी 'अंजली'च्या भूमिकेत, सुनील शेट्टी अंजलीचा प्रियकर 'देव'च्या भूमिकेत पाहायला मिळाला आहे. तर अक्षय कुमार अंजलीचा पती 'राम'च्या भूमिकेत झळकला आहे. चित्रपटातील पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. 'धडकन' चित्रपटाचे दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केले आहे. 'धडकन' चित्रपट आता तब्बल 25 वर्षांनंतर री-रिलीज होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.