Maharashtra Today Live Updates: वर्ध्याच्या पूलगावसह इतर भागात जोरदार अवकाळी पाऊस
Saam TV May 15, 2025 11:45 PM
वर्ध्याच्या पूलगावसह इतर भागात जोरदार अवकाळी पाऊस

- वर्ध्याच्या पूलगावसह इतर भागात जोरदार अवकाळी पाऊस

- वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

- शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकाचे होणार नुकसान

- अचानक पाऊस आल्याने व्यापाऱ्यांची उडाली तारांबळ

- पावसाच्या आगमनाने उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना मिळाला काहीसा दिलासा

- विजाच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस

- रात्रीपासुन जिल्ह्यात ढगाळ वातावरण

- वातावरणातील बदलामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम

Baramati: बारामती नगर परिषदेसमोर भिक मागो आंदोलन...

बारामती नगर परिषद समोर भारतीय युवा पँथर संघटना आणि पथविक्रेते यांच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आलंय.. पथविक्रेत्यांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे... बारामती शहरात अनेक वर्षापासून पथविक्रेते व्यवसाय करीत आहेत सदर पथविक्रेते यांच्यावर बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी कारवाईचा सपाटा चालू केल्यामुळे पथविक्रेते यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे... पथविक्रेत्यांना बारामती नगर परिषद हद्दीत व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी...

Nashik: नाशिकमधील अन्न औषध प्रशासनाची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

- कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद सुपारीची वाहतूक करतांना केली कारवाई

- कर्नाटक राज्यातून दिल्लीकडे जात होत्या सुपारीने भरलेल्या ट्रक

- नाशिकच्या येवला टोल नाक्यावर अन्न औषध प्रशासनाने सापळा रचत केली होती कारवाई

- एका ट्रकमध्ये जवळपास सव्वा कोटीहून अधिक रक्कमेचा माल

- अन्न औषध प्रशासन कार्यालयाच्या आवारात चक्क चार ट्रक उभे

- मात्र, अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दोनच ट्रकवर कारवाई केल्याची दिली माहिती

- तर उर्वरित सुपारीने भरलेल्या दोन ट्रकवर कारवाई कुणी केली ?

Amravati: अमरावती शहरासह ग्रामीण भागात मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात...

पुढील तीन दिवस विदर्भात ढगाळ वातावरण आणि पावसाचा हवामान खात्याने दर्शविला होता अंदाज..

अवकाळी पावसामुळे कांदा आणि संत्रा बागांना फटका बसण्याची मोठी शक्यता.......

अवकाळी पावसाने नागरिकांना मिळाला उकाळयापासून दिलासा

अवकाळी पावसाने उन्हाळी मशागतीच्या कामांना ब्रेक....

Nashik: गोदावरी नदी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा उफाळला

- प्रदूषण मुक्तीसाठी स्थापन केलेल्या समित्यांवरच प्रश्नचिन्ह

- कोट्यवधी रुपये खर्च करूनही गोदावरी नदी प्रदूषितच

- प्रदूषण मुक्तीसाठीच्या समित्या रद्द करण्याची मागणी

- गोदावरी प्रदूषण मुक्त संघर्ष समितीकडून समित्यांच्या कामकाजावर सवाल उपस्थित

- १२ वर्षे उलटूनही समित्यांना प्रदूषण रोखण्यात यश नाही

- कुंभाच्या पार्श्वभूमीवर नवीन समिती निर्माण करून गोदावरी प्रदूषण मुक्त करा

बाईट - गणेश कदम, पदाधिकारी, गोदावरी प्रदूषण मुक्त संघर्ष समिती, नाशिक

Pune News: सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडीला महापालिकेचे अधिकारी जबाबदार

पुण्यातील सिंहगड रोडवरील ट्रँफिकची समस्या सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन आत्ता कुठे अँक्शन मोड मध्ये आलंय...

राज्य मंञी माधुरी मिसाळ, ट्रँफिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी प्रत्यक्ष स्पॉट्सवर जाऊन पाहणी केली...

आणि पालिकेला उपाययोजना सुचवल्या...यावेळी तिथले जास्तीचे फूटपाथ हटवण्याचे निर्देश दिलेत .

मोठ्या प्रमाणावर ती महानगरपालिकेचे अधिकारी अतिक्रमण काढत नाहीत आणि लोकांकडून हप्ते वसूल करतात असा आरोप आमदार भीमराव तापकीर यांनी केला आहे.

हप्ते घेत असल्यामुळे अतिक्रमण निघत नाहीत आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करतात. वेळोवेळी तक्रार करूनही अधिकारी आमचं ऐकत नसल्याची खंत आमदार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केली.

कल्याण न्यायालयाकडून मद्यधुंद दुचाकीचालकाला ३ महिन्यांचा कारावास आणि २० हजारांचा दंड

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्तींना यापुढे कठोर शिक्षा भोगावी लागणार आहे. डोंबिवलीतील ४० वर्षीय विनायक नाईक याला कल्याण न्यायालयाने ३ महिन्यांचा साधा कारावास आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त १ महिन्याचा कारावास भोगावा लागेल.

विनायक नाईक याला १ फेब्रुवारी आणि ८ एप्रिल २०२५ रोजी दोन वेळा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ प्रकरणात पोलिसांनी पकडले होते. पहिल्यावेळी त्याच्यावर १० हजारांचा दंड झाला होता, आणि लायसन्स ६ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. मात्र दुसऱ्यांदा पकडले गेल्यावरही त्याने निलंबित लायसन्सवर वाहन चालवले, ज्यामुळे त्याच्यावर पुन्हा १५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

२ मे रोजी न्यायालयात त्याने गुन्हा कबूल केला, त्यानंतर कल्याण न्यायालयाने तीन महिन्यांचा कारावास व २० हजारांचा अंतिम दंड सुनावला.

डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी श्रीराम पाटील यांनी सांगितले की, जानेवारी २०२५ ते १२ मे २०२५ या कालावधीत एकूण ४६४ मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तुलनेत मागील वर्षभरात ही संख्या फक्त १२६ होती.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, वाहतूक उपायुक्त आणि सहायक पोलीस आयुक्त संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ विरोधात कठोर पावले उचलली जात आहेत.वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत आणि दारू पिऊन वाहन चालवण्याचे टाळावे, अन्यथा यापुढेही अशी कठोर शिक्षा भोगावी लागू शकते, असा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे.

रावेर तालुक्यातील धूरखेडा येथे ग्रामस्थांचे तापी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन

गेल्या 26 वर्षापासून 35 घरांचे पुनर्वसन न केल्याने धूरखेडे येथे ग्रामस्थांचे तापी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन

तापी नदीपात्रात आंदोलन केल्यामुळे दोन नागरिकांची प्रकृती खालावली

यावेळी ग्रामस्थांची बातचीत केली आहे तापी नदी पात्रातून आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी

anc धुरखेडा येथील ग्रामस्थांचे गेल्या 26 वर्षापासून पुनर्वसन करण्यात आले नसून ग्रामस्थांची तापी नदीपत्रात जलसमाधी आंदोलन

तापी नदी पात्रात आंदोलन करत असताना दोन ग्रामस्थांची प्रकृती घालवली

26 वर्षापासून 35 घरांचे पुनर्वसन शासनाने केलेला असल्यामुळे या ग्रामस्थांनी तापी नदी पात्रात एकत्र येत आंदोलन केले आहे

जिल्हाधिकारी जोपर्यंत आंदोलन स्थळी भेट देत नाही तोपर्यंत तापी नदी पात्रातून बाहेर निघणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे

वाशिम नगरपालिकेकडून दूषित पाणीपुरवठा, पाण्यात आढळल्या अळ्या आणि गाळ

वाशिम शहरातील नागरिकांना नगरपालिकेकडून सध्या 10 ते 12 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. मात्र तोही दूषित असल्याची बाब समोर आली असून, आज शहरातील सिव्हिल लाईन परिसरात पाणी सोडण्यात आल होतं मात्र या पाण्यामध्ये गाळ आणि अळ्या असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केलाय. एकीकडे नगरपालिका जलशुद्धीकरणासाठी लाखो रुपये खर्च करत असताना नागरिकांना दूषित पाणीपुरवठा का केला जातोय असा प्रश्न वाशिम शहरातील नागरिक विचारताहेत.

शरद पवार, उदय सामंत यांनी कंपनीच्या प्रदूषणाची केली पाहणी

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीकडून कोणतीही प्रक्रिया न करता थेट सांडपाणी बाहेर टाकले जातेय या ठिकाणाची पहाणी उद्योगमंत्री उदय सामंत, आणि शरद पवारांनी केलीय

रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील १२ गावांच्या शेती आणि पिण्याच्या पाण्यासह आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भुमिका घेतली असुन उदय सामंत शरद पवार अमोल कोल्हेंनी पहाणी केली

वाशिममध्ये अवकाळी पावसाचा जोर कायम, मानोरा शहरासह बेलोरा, विठोली परिसरात मुसळधार सरी

वाशिम जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, मानोरा शहरासह बेलोरा,विठोली परिसरात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून, खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळणार आहे.

खरीप हंगाम जवळ येत असतानाच या पावसामुळे जमिनीत ओलावा तयार होण्यास मदत झाली असून, नांगरणी, कुळवाच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सिध्दार्थ खरातवर गुन्हा दाखल

आमदार खरात यांचा हातात तलवार घेऊन नाचताना व्हिडिओ झाला होता व्हायरल ..

अमडापूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल ..

आमदार सिध्दार्थ खरात सह अनिल गोरे यांच्यावर गुन्हा दाखल ..

आरोपींनी लग्नाच्या वरातीत हातात तलवार फिरवून व्हिडीओ क्लिप व्हायरल केली होती .

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सिध्दार्थ खरात वर गुन्हा दाखल. .

आमदार खरात यांचा हातात तलवार घेऊन नाचताना व्हिडिओ झाला होता व्हायरल ..

यावर आ सिद्धार्थ खरात यांनी स्पष्टीकरण देत , जो व्हिडीओ वायरल झाला तो एका लग्नातील आहे व ती तलवार नवरदेव यांच्या हातातील प्रतिमात्मक होती याचा बाऊ विरोधकांनी केला आहे...

छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवणाऱ्या सहा तरुणांना बीड पोलिसांनी घेतलं ताब्यात

- बीड येथील शंभू प्रेमींनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला.. मध्यरात्री बीड बायपास येथील महालक्ष्मी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता.

- शिवप्रेमी युवा नेते स्वप्निल वरपे यांचा पुतळा बसवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा.

- स्वखर्चातून शंभू प्रेमींनी हा छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता.

- यानंतर आज सकाळी बीड ग्रामीण पोलिसांकडून यामध्ये गुन्हा दाखल करत सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

- ताब्यात घेतलेल्यांमध्ये स्वप्निल वरपे, शाम कोठेकर, राजाभाऊ यादव, तुषार मस्के रमेश नाटकर आणि गोपाल सवासे यांचा समावेश.

- प्रशासनाकडून कुठलीही पूर्व परवानगी न घेता पुतळा बसवल्याने गुन्हा दाखल.

- भारतीय न्याय संहितेचे कलम 189 (2), 329 (3) आणि महाराष्ट्र पुतळ्याचे पावित्र्य भंगास प्रतिबंध अधिनियम 1997 च्या कलम 11 नुसार कारवाई.

- पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती ठाणे प्रमुख बंटेवाड यांनी दिली आहे.

- ॲड. शशिकांत सावंत (आरोपींचे वकील)

मोहोळ तालुक्यातील पापरी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

वादळी वाऱ्यामुळे पापरी पारिसरातील केळी बाग भुईसपाट

पापरी गावातील दत्ता कदम या शेतकऱ्याची दीड एकर केळी बाग जमीनदोस्त..

वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याला बसला लाखो रुपयांचा आर्थिक फटका

त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात आठवड्याभरापासून अवकाळी पावसाचा थैमान

वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान.....

शेती पिकांसोबतच फळबागांचे देखील नुकसान केळी पपई आणि आंब्याचे देखील नुकसान....

अवकाळी पावसामुळे सर्वाधिक शहादा तालुक्यात केळीचे नुकसान....

वादळी वाऱ्यामुळे ब्राह्मणपुरी परिसरात केळी झाली जमीनदोस्त....

दहावी पुरवणी परीक्षा प्रक्रिया आजपासून, 29 मे पर्यंत विद्यार्थ्यांना संधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे

त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे

विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 24 मे पर्यंत तर विलंब शुल्कासह 29 मे पर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मंडणगड दौऱ्यावर

मंडणगडमध्ये टाकेडे येथे मिलन वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला उपस्थित

मुख्यमंत्र्यांसोबत राज्यमंत्री योगेश कदम , महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माहीती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित राहणार

कल्याण पोलीस उपायुक्त मंडळाची कारवाई, सहा महिन्यात ड्रग्स तस्करांविरोधात 50 गुन्हे दाखल

कल्याण डोंबिवली परिसरातील चरस, गांजा, एमडी यासारख्या नशेच्या पदार्थाची विक्री करणाऱ्या ड्रग्स तस्करांवर कारवाईचा बडगा उगारत पोलीस डीसीपी स्कॉडने तब्बल 50 गुन्हे दाखल केले आहेत तर 29 लाखाच्या अमली पदार्थासह 65 आरोपींना अटक केली आहे.

कल्याण परिमंडळ तीनचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सुरुवातीपासूनच अमली पदार्थ विरोधी कारवाई मोहीम हाती घेतली आहे. तरुण पिढीला नशेच्या आहारी लोटणाऱ्या समाज कंटकांविरोधात कारवाई करत या नशेखोरांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून अमली पदार्थ विरोधी कारवाई सातत्याने सुरु आहे. रात्रीची गस्त वाढवत, निर्जन स्थळावर होणा-या अमली पदार्थाच्या पाटर्यावर लक्ष ठेवत, गुन्हेगारांची धरपकड करत नशेचे अड्डे उध्वस्त केले जात आहेत. ऑक्टोबर 2024 ते मे 2025 या सहा महिन्याच्या कालावधीत कल्याण डोंबिवली पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत 29 लाख 55 हजार रुपये किंमतीचा 113.731 कि ग्रॅम गांजा, 258.61 ग्राम एमडी, 10 ग्राम चरस आणि कोडीनयुक्त औषधाच्या बाटल्या असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 50 गुन्हे दाखल करत

या प्रकरणी 65 आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत . .पोलीस उपायुक्तांचे अमली पदार्थ विरोधी पथक 24 तास सक्रीय असून केवळ नशेखोरांवरच नव्हे तर नशिल्या पदार्थाची विक्री करणार्या तस्कर तसेच पुरवठादारांपर्यत पोहोचून ही साखळी तोडण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचे झेंडे यांनी सांगितले.

अमरावतीच्या भाजप कार्यालयात नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांचे जंगी स्वागत

स्वागताला भाजपा नेत्या माजी खासदार नवनीत राणा ही उपस्थित.

यावेळी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आणि नवनियुक्त शहराध्यक्ष डॉ नितीन धांडे यांनी ढोल ताशावर धरला ठेका..

अमरावती भाजप जिल्हाध्यक्षपदी रविराज देशमुख आणि प्रभुदास भिलावेकर यांची नियुक्ती तर शहराध्यक्षपदी नितीन धांडे यांची निवड.

अमरावती जिल्ह्यातील 121 ग्रामपंचायतीत अजूनही पोटनिवडणुकीची प्रतीक्षा कायम

अंतिम मतदार यादी चा कार्यक्रम; सहा सरपंचासह 189 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा रिक्त.

ग्रामपंचायत मध्ये 26 मार्च रोजी अंतिम मतदार यादी करण्यात आली आहे प्रसिद्ध...

गाव पुढाऱ्यांना लागले, ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीचे वेध..

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इंदापूर तालुक्यात आज दोन जाहीर सभा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इंदापूर तालुक्यात आज दोन जाहीर सभा होणार आहेत इंदापूर तालुक्यातील कुरवली आणि अकोले या ठिकाणी अजित पवार यांच्या जाहीर सभा होणार असून छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीच्या प्रचारार्थ अजित पवार सभा घेणार आहेत

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असून 18 मे रोजी मतदान होणार आहे सर्वपक्षीय श्री भवानी माता पॅनल आणि शेतकरी बचाव पॅनल यांच्यातील लढत होत आहे

कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलाने एका घरात शिरून पिस्तुलीचा धाक दाखवला

मुलीच्या कुटुंबीयांना भीती दाखवण्यासाठी चक्क पिस्तूलचा धाक दाखवणाऱ्या अल्पवयीन प्रेमवीराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यालाही पिस्तूल पुरविणारा ऋतुराज दत्तात्रय भिलूकडे या माजी उपसरपंच पुत्राला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयीतांकडून गावठी बनावटीची पिस्तूल, दोन जिवंत काढतूसे असा 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या पिस्तुलाच्या धाकावर आणखी कोणाला धमकावले आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत

भोर महाड मार्गावरील हिर्डोशी हद्दीत चिखलाचा राडारोडा

भोर महाड रस्त्याच्या रुदीकरणाच्या कामामुळे भोर पासून हिर्डोशी गावच्या हद्दीपर्यंत जागोजागी केलेल्या खोदकामामुळे झालेल्या पावसामुळे रस्ता चिखलमय झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची मोठी तारांबळ झाली. प्रत्येक वेळी पाऊस पडला ही चिखलाची समस्या नित्याची होऊन बसली आहे. प्रशासन व ठेकेदार यांचेकडून सुरक्षेची दखल घेण्याची गरज असून यातून मोठा अनर्थ होण्याची वाट पहातेय का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मॉक ड्रिल

आदेशाची वाट न पाहता सर्व वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर उतरण्याच्या सूचना

पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आतापासून तयारी सुरु करावी

आठवडाभरात महापालिका, अग्निशमन दल यांच्याशी समन्वय साधून मॉक ड्रिल करावी

पावसाळ्यात वाहतूक कोंडी झाल्यास आदेशाची वाट न पाहता सर्व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रस्त्यावर उतरावे असे स्पष्ट आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहेत.

दोन कोटी सहा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी यशोधन चौधरी ला पोलिसांकडून अटक

पुण्यातील बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कोटी सहा लाख रुपयांच्या कंत्राटी कामात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय.

BNC पावर प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीकडून एकाच कामाची परचेस ऑर्डर दोन कंपन्यांना देऊन शर्वाय इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड 2कोटी 6 लाख रुपयांना फसवल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद

चार आरोपींना पोलिसांनी केली अटक

Crime News: धाराशिवमध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालयातच शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या

धाराशिव मधील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सहायक संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयात मुक्कामी असलेल्या एका शिपायाने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.शहरातील खाजा नगर भागात राहणारे नक्कियोद्दीन बशीरोद्दीन काझी असं आत्महत्या केलेल्या शिपायाच नाव आहे.दरम्यान या प्रकरणी आनंदनगर पोलीसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Jalna Water Shortage: जालना जिल्ह्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा; 150 टँकरच्या माध्यमातून 306 खेपा सुरू

जालना जिल्ह्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा नागरिकांना बसत आहे आणि टँकरची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून आलं.

आठवडाभरापूर्वी जालना जिल्ह्यात 137 टँकर सुरू होते.

मात्र यामध्ये 18 टँकरची भर पडली असून प्रत्येक आठवड्याला टँकरचा आकडा वाढतच जात आहे.

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने जालना जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पातला पाणीसाठा देखील बाष्पीभवनामुळे झपाट्याने घटत आहे.

त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सध्या जालना जिल्ह्यात 92 गावे आणि 23 वाड्यांना 155 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर 204 विहिरीचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे..

धाराशिव जिल्ह्याला खरीपासाठी मिळणार 1 लाख 29 हजार टन खते

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील प्रस्तावित 5 लाख 89 हजार 841 हेक्टर क्षेत्रासाठी यंदा 85 हजार 845 टन रासायनिक खतांचा साठा कृषी आयुक्तालयाकडून मंजुर झाला आहे.याशिवाय मागील वर्षातील 43 हजार 207 टन खत शिल्लक आहे.त्यामुळे यंदाच्या खरीपासाठी 1 लाख 29 हजार 52 टन खते उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Latur: लातूर शहरातल्या फर्निचर दुकानाला भीषण आग, लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती

लातूर शहरातल्या औसा रोड भागातील एका फर्निचर दुकानाला भीषण आग लागली आहे.... मध्यरात्री अचानक आग लागल्याने दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे... तर रात्री पासून सकाळपर्यंत ही,आग आटोक्यात आणण्याचे अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली आहे.. दरम्यान या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची देखील माहिती समोर येते आहे . तर ही आग नेमकी कशाने लागली हे अद्याप समजू शकल नाही....

कर्नाटकातून महाराष्ट्रात अवैधरित्या येणारा 14 लाखांचा सुगंधी तंबाखू व गुटखा जप्त

सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे प्रतिबंध असणाऱ्या पान मसाला आणि गुटख्यावर कारवाई करण्यात आली आहे.सुगंधी तंबाखु व गुटख्यासह 14 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर चिंदानंद नेसरगी राहणार बेळगाव कुडची यास अटक केली आहे.

शासनाकडून बंदी असलेल्या पान मसाला गुटख्याची सीमावर्ती भागातून जिल्ह्यात तस्करी होत होते. यावर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याची तक्रार ही होत होती.

सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू गुटखा असा तंबाखूजन्यमान येत असल्याचेही माहिती मिरज ग्रामीण पोलिसांनी मिळाली.

कर्नाटक इथून एक ट्रक सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने येत होते. पोलिसांनी तात्काळ म्हैसाळ पंपग्रह येथे सापळा लावून ट्रक थांबवला.

ट्रकची पाहणी केली असता त्यात सुगंधी पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही तो विक्रीसाठी आणला जात होता. मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये 14 लाख वीस हजार रुपयांचा गुटखा साठ जप्त करण्यात आला आहे. तसेच ट्रक ही ताब्यात घेण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Dharashiv: धाराशिवमध्ये वादळी वारा अन् अवकाळीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका

धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

अचानक येत असलेला पावसाने व वादळी वाऱ्यामुळे केळीची पाने फाटत असल्याने त्याचा परिणाम थेट उत्पन्नावर होणार असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झालीं आहे.

त्यामुळे हजारो रुपये खर्च करून तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या या बागेतून खर्च निघणार का? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय.

पूरस्थितीत जीवित हानी टाळा, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचना

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सरासरी जास्त पाऊस असल्याने सर्व यंत्रणा सज्ज ठेवा अशा सूचना

आपत्तीच्या काळात विभागांमध्ये समन्वय ठेवा. जिल्हास्तरावर महसूल पोलीस जलसंपदा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आरोग्य विभागाने समन्वयासाठी बैठक घ्यावी.

मान्सून पूर्व विभागीय आढावा बैठकीत विभाग आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचना

Navi Mumbai: नवी मुंबई शहराचा खंडित झालेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी पालिकेचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु

नवी मुंबई महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागामार्फत घेण्यात आलेल्या शट डाऊन कामात चिखले येथील 2050 मिलिमीटर व्यासाची रेल्वे ब्रिजच्या दोन्ही बाजूकडील मोरबे नवीन मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम प्रगतीपथावर असून खंडित झालेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्ध पातळीवर असल्याचं नवी मुंबई पालिकेकडून सांगण्यात येतंय..

Pune News: पुण्यातील सुकामेवा व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानमधून येणाऱ्या सुक्यामेव्यावर बहिष्कार

साधारण पुण्यात दरवर्षी शंभरकोटीचार तुक्रस्थानातून सुक्यामेव्याची आयात केली जाते..

या बहिष्कारामुळे तुर्कस्तान वर मोठा आर्थिक परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे..

पुणे मार्केट यार्ड परिसरात सुकामेवा व्यापारी असोसिएशनने तुर्कस्थानातील सुक्यामेव्या बहिष्कार करण्याचा निर्धार करत पहिले देश नंतर व्यापार अशी भूमिका घेतली आहे .

भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावात तुर्कस्तान ने पाकिस्तानला लष्करी आणि युद्ध सामग्रीची मदत केली होती.

भारतीय सैन्य जसे सीमेवर लढत आहे. तसे आमचे हे व्यापार युद्ध असल्याचे पुण्यातील सुका मेवा व्यापारी संघटनेने सांगितले आहे..

Tuljapur: तुळजाभवानी मंदिरात गैरप्रकार करणाऱ्या पुजाऱ्यांवर मंदिर बंदीची कारवाई

तुळजाभवानी मंदिरात गैरप्रकार करणाऱ्या पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानचे कडक कारवाई करत मंदीर बंदीचा बडगा उगारला आहे.

विशेष म्हणजे गेल्या 6 महीन्यात तब्बल 12 पुजाऱ्यांवर मंदिर बंदी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

तुळजाभवानी मंदिरात गर्दीचा कालावधीत दर्शन रांगेत घुसखोरी करणे, गाभाऱ्यात घुसखोरी करणे यासह विविध गैरप्रकारात दोषी पुजाऱ्यांवर मंदिर संस्थान नोटीसा बजावत खुलासा मागते व खूलासा समाधानकारक नसल्यास पुजाऱ्यांवर मंदिर बंदीची कारवाई करण्यात येते.

मागील सहा महिन्यात अनेक पुजाऱ्यांना नोटीसा बजावल्या होत्या त्यापैकी 12 पुजाऱ्यांवर मंदिर बंदी करण्यात आल्याची माहिती मंदिर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

लातूरमध्ये विद्यार्थ्याला वस्तीगृहात अमानुष मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

लातूर शहरात शिक्षणासाठी राहत असलेल्या विद्यार्थ्याला अमानुष पद्धतीने बेदम मारहाण करण्यात आली आहे...

शहरातल्या सह्याद्री बॉईज हॉस्टेल या ठिकाणी या विद्यार्थ्याला कमरेच्या बेल्टने अमानुष पद्धतीने शिवीगाळ करत मारहाण मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे...

व्हिडिओ पाहून रात्री उशिरा लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी हनुमंत जाधव या व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय..

मात्र धक्कादाय बाब म्हणजे मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांने भीतीपोटी वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी नीटची परीक्षा देखील दिली नसल्याची माहिती समोर येते आहे...

मात्र या मारहाणीच्या व्हिडिओ मुळे सध्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.. तर मारहाण करण्यामागच नेमकं, कारण काय याचा तपास सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस घेत आहेत...

मुरूड ताडवाडी येथील विहिरीत वीट टाकल्याचे प्रकरणी तांत्रिकाला अटक

कल्याणच्या गोविंद वाडी परिसरातून रेवदंडा पोलिसांनी एका मांत्रिकाला अटक केली आहे. मुलीची प्रेम प्रकरणातून सुटका करण्यासाठी दोरा बांधलेल्या 21 विटा वेगवेगळ्या विहिरींमध्ये टाकण्याचा सल्ला या मांत्रिकाने नवी मुंबईत राहणाऱ्या एका दाम्पत्याला दिला होता. मुरूड तालुक्यातील ताडवाडी इथं दोरा बांधलेली वीट विहिरीत टाकताना ग्रामस्थानी पकडले होते. त्यावरून मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी यात जादूटोणा विरोधी कायद्याने गुन्हा दाखल केला असून त्या नंतर हि कारवाई केली आहे

Accident News: पुणे- बेंगलोर महामार्गावर कराडजवळ अपघात, डी मार्ट मधील दोन कर्मचारी युवती ठार

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळील आटके गावच्या हद्दीत आयशर टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात डी मार्ट मधील दुचाकीवर असणाऱ्या दोन युवती जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

आयशर टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्याने युवती जागीच ठार झाल्या असून

करिष्मा कळसे, पूजा कुऱ्हाडे असे अपघातात ठार झालेल्या युवतींची नावे आहेत. अपघातानंतर लोकांनी आयशर टेम्पोवर दगडफेक केली.

मध्यप्रदेश येथील मंत्री विजय शहानी कर्नल सोफिया कुरेशी विषयी केले वादग्रस्त वक्तव्य

मध्यप्रदेशचा सामाजिक न्याय मंत्री कुवर विजय शहा यांनी मध्य प्रदेशातील महू येथील जाहीर सभेत भारतीय स्थल सेनेची कर्नल व सिन्दुर या ऑपरेशन ची समन्वयक कर्नल सोफिया कुरेशी या वीर कर्नलला, "पाकिस्तानच्या आतंकवाद्यांची बहीण व आतंकवाद्यांच्या बहीनिच्याच हाताने पाकिस्तानच्या आतंकवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाठवले व तिने पाकिस्तानची आयसीच्या तैसी केली" अशा प्रकारचे अभद्र, अमानवीय, व बर्बारातापूर्ण वादग्रस्त वक्तव्य केले या वक्तव्याचा जिल्ह्यातील उबाठाच्या वाटूने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला असून त्या मंत्री शहाचे मंत्रिपद बरखास्त करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रपती कडे तहसीलदार मार्फत करण्यात आली आहे...

लोणार येथील उबाठाचे नेते गोपाल बचिरे यांच्या नेतृत्वात लोणार तहसील कार्याल्यासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले..

सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले हजारो शेतकरी

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आज शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. .

यावेळी कर्जमुक्ती आणि पीक विमा मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी आपले मागणीचे अर्ज प्रशासनाकडे सादर केलेय. .

निवडणूक पूर्वी सत्तेतील सरकारने संपूर्ण कर्जमुक्ती करूच आश्वासन दिले होते, तर अद्याप पूर्ण झाले नाही, त्यामूळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होत आहे.

नुकसान होऊनही पीक विमा मिळत नाही, ते पीक विमा द्यावा, या दोन्ही प्रमुख मागण्या घेऊन हजारो शेतकऱ्यांनी आज एस डी ओ कार्यालयावर धडक दिलीय आणि मागणी केलीय ..

एक जुन पर्यंत मागण्या मंजूर करा अन्यथा 2 जुन ला मुंबई मध्ये मंत्राल्यावर् मोर्चा कडून व मुंबई ला जाणारे सर्व मार्ग रोखून धरू असा इशारा यावेळी.देण्यात आलाय...

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.