IPL 2025 : ऋषभ पंतपेक्षा ‘या’ खेळाडूला मिळणार सर्वाधिक रक्कम! दिल्ली कॅपिट्ल्सकडून इतके पैसे
GH News May 15, 2025 04:15 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी दुबईत एकूण 2 दिवस मेगा ऑक्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेगा ऑक्शनमध्ये विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याने चांगलाच भाव खाल्ला होता. ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. दिल्ली कॅपिट्ल्सने ऋषभसाठी 27 कोटी रुपये मोजले. मात्र दिल्ली कॅपिट्ल्सने या 18 व्या मोसमादरम्यान एका खेळाडूला संधी दिलीय ज्याची कमाई पंतपेक्षा जास्त असणार आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने बांगलादेशच्या मुस्तफिजुर रहमान याचा जॅक फ्रेजर मॅकगर्क याच्या जागी संधी देण्यात आलीय.

दिल्ली कॅपिट्ल्सने जॅक फ्रेजर मॅकगर्क याच्यासाठी 9 कोटी रुपये मोजले होते. मात्र दिल्लीने मुस्तफिजुर रहमान याला 6 कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केलं. आता मुस्तफिजुरला पंतपेक्षा जास्त रक्कम कशी मिळणार? असा प्रश्न पडला असणार. आम्ही खेळाडूला मिळणाऱ्या एकूण रक्कमेबद्दल बोलत नसून, एका सामन्यासाठी मिळणाऱ्या रक्कमेच्या निकषावर सांगतोय की मुस्तफिजुरला पंतपेक्षा अधिक रक्कम मिळू शकते.

मुस्तफिजुरला पंतपेक्षा जास्त रक्कम कशी काय?

नियमानुसार, साखळी फेरीत प्रत्येक संघ 14 सामने खेळतो. त्यानंतर प्लेऑफचा थरार पार पडतो. मात्र प्लेऑफमध्ये कोण पोहचणार हे अजून ठरायचं आहे. मुस्तफिजूर रहमान (दिल्ली कॅपिट्ल्स) आणि ऋषभ पंत (लखनौ सुपर जायंट्स) हे 2 संघ प्लेऑफमध्ये पोहचणार की नाहीत? हे नक्की नाही. मात्र दोन्ही संघांचे प्रत्येकी 14-14 होणार हे निश्चित आहे.

दिल्लीने पंतला 27 कोटी रुपये मोजून आपल्यासह घेतलं. पंतला 14 सामन्यांच्या हिशोबाने प्रत्येकी एका मॅचसाठी 1.9 कोटी रुपये मिळतात. तर मुस्तफिजुरला 6 कोटीनुसार उर्वरित 3 सामन्यांसाठी प्रत्येकी 2-2 कोटी कुपये मिळतील. मुस्तफिजुर याचं आयपीएलच्या 18 व्या मोसमात खेळणार नसल्याचं स्पष्ट आहे. कारण मुस्तफिजूरने दिल्ली कॅपिट्ल्सची ऑफर धुडकावून लावलीय. मुस्तफिजुर रहमान यूएईला रवाना झाला आहे. मुस्तफिजुरने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिलीय.

मुस्तफिजुर रहमानला दिल्ली कॅपिट्ल्सकडून संधी

मीडिया रिपोर्ट्नुसार, मुस्तफिजुरला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र (Noc) मिळालं नसल्याचं म्हटलं जात आहे. याचं कारण म्हणजे यूएई विरुद्ध बांगलादेश मालिका. बांगलादेश विरुद्ध यूएई यांच्यात 17 आणि 19 मे रोजी टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. तर त्यानंतर बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 25 मे पासून 5 सामन्यांची टी 20i मालिका आयोजित करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.