भोर महाड रस्त्याच्या रुदीकरणाच्या कामामुळे भोर पासून हिर्डोशी गावच्या हद्दीपर्यंत जागोजागी केलेल्या खोदकामामुळे झालेल्या पावसामुळे रस्ता चिखलमय झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची मोठी तारांबळ झाली. प्रत्येक वेळी पाऊस पडला ही चिखलाची समस्या नित्याची होऊन बसली आहे. प्रशासन व ठेकेदार यांचेकडून सुरक्षेची दखल घेण्याची गरज असून यातून मोठा अनर्थ होण्याची वाट पहातेय का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मॉक ड्रिलआदेशाची वाट न पाहता सर्व वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर उतरण्याच्या सूचना
पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आतापासून तयारी सुरु करावी
आठवडाभरात महापालिका, अग्निशमन दल यांच्याशी समन्वय साधून मॉक ड्रिल करावी
पावसाळ्यात वाहतूक कोंडी झाल्यास आदेशाची वाट न पाहता सर्व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रस्त्यावर उतरावे असे स्पष्ट आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहेत.
दोन कोटी सहा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी यशोधन चौधरी ला पोलिसांकडून अटकपुण्यातील बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कोटी सहा लाख रुपयांच्या कंत्राटी कामात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय.
BNC पावर प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीकडून एकाच कामाची परचेस ऑर्डर दोन कंपन्यांना देऊन शर्वाय इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड 2कोटी 6 लाख रुपयांना फसवल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद
चार आरोपींना पोलिसांनी केली अटक
Crime News: धाराशिवमध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालयातच शिपायाची गळफास घेऊन आत्महत्याधाराशिव मधील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सहायक संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयात मुक्कामी असलेल्या एका शिपायाने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.शहरातील खाजा नगर भागात राहणारे नक्कियोद्दीन बशीरोद्दीन काझी असं आत्महत्या केलेल्या शिपायाच नाव आहे.दरम्यान या प्रकरणी आनंदनगर पोलीसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Jalna Water Shortage: जालना जिल्ह्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा; 150 टँकरच्या माध्यमातून 306 खेपा सुरूजालना जिल्ह्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा नागरिकांना बसत आहे आणि टँकरची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून आलं.
आठवडाभरापूर्वी जालना जिल्ह्यात 137 टँकर सुरू होते.
मात्र यामध्ये 18 टँकरची भर पडली असून प्रत्येक आठवड्याला टँकरचा आकडा वाढतच जात आहे.
दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने जालना जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पातला पाणीसाठा देखील बाष्पीभवनामुळे झपाट्याने घटत आहे.
त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सध्या जालना जिल्ह्यात 92 गावे आणि 23 वाड्यांना 155 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर 204 विहिरीचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे..
धाराशिव जिल्ह्याला खरीपासाठी मिळणार 1 लाख 29 हजार टन खतेखरीप हंगामासाठी जिल्ह्यातील प्रस्तावित 5 लाख 89 हजार 841 हेक्टर क्षेत्रासाठी यंदा 85 हजार 845 टन रासायनिक खतांचा साठा कृषी आयुक्तालयाकडून मंजुर झाला आहे.याशिवाय मागील वर्षातील 43 हजार 207 टन खत शिल्लक आहे.त्यामुळे यंदाच्या खरीपासाठी 1 लाख 29 हजार 52 टन खते उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
Latur: लातूर शहरातल्या फर्निचर दुकानाला भीषण आग, लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहितीलातूर शहरातल्या औसा रोड भागातील एका फर्निचर दुकानाला भीषण आग लागली आहे.... मध्यरात्री अचानक आग लागल्याने दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे... तर रात्री पासून सकाळपर्यंत ही,आग आटोक्यात आणण्याचे अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली आहे.. दरम्यान या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची देखील माहिती समोर येते आहे . तर ही आग नेमकी कशाने लागली हे अद्याप समजू शकल नाही....
कर्नाटकातून महाराष्ट्रात अवैधरित्या येणारा 14 लाखांचा सुगंधी तंबाखू व गुटखा जप्तसांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे प्रतिबंध असणाऱ्या पान मसाला आणि गुटख्यावर कारवाई करण्यात आली आहे.सुगंधी तंबाखु व गुटख्यासह 14 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर चिंदानंद नेसरगी राहणार बेळगाव कुडची यास अटक केली आहे.
शासनाकडून बंदी असलेल्या पान मसाला गुटख्याची सीमावर्ती भागातून जिल्ह्यात तस्करी होत होते. यावर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याची तक्रार ही होत होती.
सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू गुटखा असा तंबाखूजन्यमान येत असल्याचेही माहिती मिरज ग्रामीण पोलिसांनी मिळाली.
कर्नाटक इथून एक ट्रक सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने येत होते. पोलिसांनी तात्काळ म्हैसाळ पंपग्रह येथे सापळा लावून ट्रक थांबवला.
ट्रकची पाहणी केली असता त्यात सुगंधी पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही तो विक्रीसाठी आणला जात होता. मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये 14 लाख वीस हजार रुपयांचा गुटखा साठ जप्त करण्यात आला आहे. तसेच ट्रक ही ताब्यात घेण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
Dharashiv: धाराशिवमध्ये वादळी वारा अन् अवकाळीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटकाधाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
अचानक येत असलेला पावसाने व वादळी वाऱ्यामुळे केळीची पाने फाटत असल्याने त्याचा परिणाम थेट उत्पन्नावर होणार असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झालीं आहे.
त्यामुळे हजारो रुपये खर्च करून तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या या बागेतून खर्च निघणार का? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय.
पूरस्थितीत जीवित हानी टाळा, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचनाहवामान विभागाच्या अंदाजानुसार सरासरी जास्त पाऊस असल्याने सर्व यंत्रणा सज्ज ठेवा अशा सूचना
आपत्तीच्या काळात विभागांमध्ये समन्वय ठेवा. जिल्हास्तरावर महसूल पोलीस जलसंपदा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आरोग्य विभागाने समन्वयासाठी बैठक घ्यावी.
मान्सून पूर्व विभागीय आढावा बैठकीत विभाग आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचना
Navi Mumbai: नवी मुंबई शहराचा खंडित झालेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी पालिकेचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरुनवी मुंबई महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागामार्फत घेण्यात आलेल्या शट डाऊन कामात चिखले येथील 2050 मिलिमीटर व्यासाची रेल्वे ब्रिजच्या दोन्ही बाजूकडील मोरबे नवीन मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम प्रगतीपथावर असून खंडित झालेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्ध पातळीवर असल्याचं नवी मुंबई पालिकेकडून सांगण्यात येतंय..
Pune News: पुण्यातील सुकामेवा व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानमधून येणाऱ्या सुक्यामेव्यावर बहिष्कारसाधारण पुण्यात दरवर्षी शंभरकोटीचार तुक्रस्थानातून सुक्यामेव्याची आयात केली जाते..
या बहिष्कारामुळे तुर्कस्तान वर मोठा आर्थिक परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे..
पुणे मार्केट यार्ड परिसरात सुकामेवा व्यापारी असोसिएशनने तुर्कस्थानातील सुक्यामेव्या बहिष्कार करण्याचा निर्धार करत पहिले देश नंतर व्यापार अशी भूमिका घेतली आहे .
भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावात तुर्कस्तान ने पाकिस्तानला लष्करी आणि युद्ध सामग्रीची मदत केली होती.
भारतीय सैन्य जसे सीमेवर लढत आहे. तसे आमचे हे व्यापार युद्ध असल्याचे पुण्यातील सुका मेवा व्यापारी संघटनेने सांगितले आहे..
Tuljapur: तुळजाभवानी मंदिरात गैरप्रकार करणाऱ्या पुजाऱ्यांवर मंदिर बंदीची कारवाईतुळजाभवानी मंदिरात गैरप्रकार करणाऱ्या पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानचे कडक कारवाई करत मंदीर बंदीचा बडगा उगारला आहे.
विशेष म्हणजे गेल्या 6 महीन्यात तब्बल 12 पुजाऱ्यांवर मंदिर बंदी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
तुळजाभवानी मंदिरात गर्दीचा कालावधीत दर्शन रांगेत घुसखोरी करणे, गाभाऱ्यात घुसखोरी करणे यासह विविध गैरप्रकारात दोषी पुजाऱ्यांवर मंदिर संस्थान नोटीसा बजावत खुलासा मागते व खूलासा समाधानकारक नसल्यास पुजाऱ्यांवर मंदिर बंदीची कारवाई करण्यात येते.
मागील सहा महिन्यात अनेक पुजाऱ्यांना नोटीसा बजावल्या होत्या त्यापैकी 12 पुजाऱ्यांवर मंदिर बंदी करण्यात आल्याची माहिती मंदिर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
लातूरमध्ये विद्यार्थ्याला वस्तीगृहात अमानुष मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरललातूर शहरात शिक्षणासाठी राहत असलेल्या विद्यार्थ्याला अमानुष पद्धतीने बेदम मारहाण करण्यात आली आहे...
शहरातल्या सह्याद्री बॉईज हॉस्टेल या ठिकाणी या विद्यार्थ्याला कमरेच्या बेल्टने अमानुष पद्धतीने शिवीगाळ करत मारहाण मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे...
व्हिडिओ पाहून रात्री उशिरा लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी हनुमंत जाधव या व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय..
मात्र धक्कादाय बाब म्हणजे मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांने भीतीपोटी वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी नीटची परीक्षा देखील दिली नसल्याची माहिती समोर येते आहे...
मात्र या मारहाणीच्या व्हिडिओ मुळे सध्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.. तर मारहाण करण्यामागच नेमकं, कारण काय याचा तपास सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस घेत आहेत...
मुरूड ताडवाडी येथील विहिरीत वीट टाकल्याचे प्रकरणी तांत्रिकाला अटककल्याणच्या गोविंद वाडी परिसरातून रेवदंडा पोलिसांनी एका मांत्रिकाला अटक केली आहे. मुलीची प्रेम प्रकरणातून सुटका करण्यासाठी दोरा बांधलेल्या 21 विटा वेगवेगळ्या विहिरींमध्ये टाकण्याचा सल्ला या मांत्रिकाने नवी मुंबईत राहणाऱ्या एका दाम्पत्याला दिला होता. मुरूड तालुक्यातील ताडवाडी इथं दोरा बांधलेली वीट विहिरीत टाकताना ग्रामस्थानी पकडले होते. त्यावरून मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी यात जादूटोणा विरोधी कायद्याने गुन्हा दाखल केला असून त्या नंतर हि कारवाई केली आहे
Accident News: पुणे- बेंगलोर महामार्गावर कराडजवळ अपघात, डी मार्ट मधील दोन कर्मचारी युवती ठारपुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळील आटके गावच्या हद्दीत आयशर टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात डी मार्ट मधील दुचाकीवर असणाऱ्या दोन युवती जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
आयशर टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्याने युवती जागीच ठार झाल्या असून
करिष्मा कळसे, पूजा कुऱ्हाडे असे अपघातात ठार झालेल्या युवतींची नावे आहेत. अपघातानंतर लोकांनी आयशर टेम्पोवर दगडफेक केली.
मध्यप्रदेश येथील मंत्री विजय शहानी कर्नल सोफिया कुरेशी विषयी केले वादग्रस्त वक्तव्यमध्यप्रदेशचा सामाजिक न्याय मंत्री कुवर विजय शहा यांनी मध्य प्रदेशातील महू येथील जाहीर सभेत भारतीय स्थल सेनेची कर्नल व सिन्दुर या ऑपरेशन ची समन्वयक कर्नल सोफिया कुरेशी या वीर कर्नलला, "पाकिस्तानच्या आतंकवाद्यांची बहीण व आतंकवाद्यांच्या बहीनिच्याच हाताने पाकिस्तानच्या आतंकवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाठवले व तिने पाकिस्तानची आयसीच्या तैसी केली" अशा प्रकारचे अभद्र, अमानवीय, व बर्बारातापूर्ण वादग्रस्त वक्तव्य केले या वक्तव्याचा जिल्ह्यातील उबाठाच्या वाटूने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला असून त्या मंत्री शहाचे मंत्रिपद बरखास्त करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रपती कडे तहसीलदार मार्फत करण्यात आली आहे...
लोणार येथील उबाठाचे नेते गोपाल बचिरे यांच्या नेतृत्वात लोणार तहसील कार्याल्यासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले..
सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले हजारो शेतकरीबुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आज शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. .
यावेळी कर्जमुक्ती आणि पीक विमा मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी आपले मागणीचे अर्ज प्रशासनाकडे सादर केलेय. .
निवडणूक पूर्वी सत्तेतील सरकारने संपूर्ण कर्जमुक्ती करूच आश्वासन दिले होते, तर अद्याप पूर्ण झाले नाही, त्यामूळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होत आहे.
नुकसान होऊनही पीक विमा मिळत नाही, ते पीक विमा द्यावा, या दोन्ही प्रमुख मागण्या घेऊन हजारो शेतकऱ्यांनी आज एस डी ओ कार्यालयावर धडक दिलीय आणि मागणी केलीय ..
एक जुन पर्यंत मागण्या मंजूर करा अन्यथा 2 जुन ला मुंबई मध्ये मंत्राल्यावर् मोर्चा कडून व मुंबई ला जाणारे सर्व मार्ग रोखून धरू असा इशारा यावेळी.देण्यात आलाय...