अॅपलचे CEO टिम कुकचा पगार एकूण धक्का बसेल, महिन्याला नेमका किती मिळतो पगार?
Marathi May 15, 2025 11:25 PM

टिम कुक नेट वर्थ: जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅपलचे सीईओ टिम कुक केवळ त्यांच्या कामामुळेच नव्हे तर त्यांच्या जबरदस्त कमाईमुळेही चर्चेत असतात. आयफोन, आयपॅड आणि मॅक सारख्या उत्पादनांद्वारे जगभरात प्रसिद्ध झालेल्या अ‍ॅपल कंपनीच्या प्रमुखांचा मासिक पगार किती असेल? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? त्यांची एकूण संपत्ती किती आहे हे एकूण तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

टिम कुकचा एकूण पगार 74.6 दशलक्ष डॉलर्स

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2024 मध्ये टिम कुकचा एकूण पगार 74.6 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 643 कोटी रुपये होईल. तर 2023 मध्ये त्याचा पगार 63.2 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 544 कोटी रुपये होता. जर आपण टिम कुकच्या मासिक पगाराबद्दल बोललो तर या वर्षी त्याचा मासिक पगार सुमारे 54 कोटी रुपये आहे. टिम कुक त्यांच्या वाढत्या संपत्ती असूनही साधे जीवन जगण्यासाठी ओळखले जातात.

पगाराचा मोठा भाग स्टॉकमधून येतो

टिम कुकच्या पगारात केवळ मूळ वेतनच नाही तर अॅपल कंपनीच्या शेअर्सची किंमत देखील समाविष्ट आहे. हे स्टॉक कंपनी त्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर देते. म्हणूनच अॅपलच्या बाजार मूल्यावर आणि कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून त्याची एकूण कमाई दरवर्षी वाढू किंवा कमी होऊ शकते.

2025  मध्ये टिम कुकची एकूण संपत्ती किती?

अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांची संपत्ती अब्जावधींवर पोहोचली आहे. फोर्ब्सच्या मते, मार्च 2025 च्या मध्यापर्यंत, त्यांची एकूण संपत्ती 2.4 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 20000 कोटी रुपये इतकी आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्या प्रचंड कमाईच्या बातम्या येत आहेत, परंतु 2024 मध्ये कंपनीच्या इतर उच्च अधिकाऱ्यांच्या पगारातही मोठी वाढ केली होती. रिपोर्ट्सनुसार, अॅपलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जसे की चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, चीफ फायनान्शियल ऑफिसर, रिटेल चीफ आणि जनरल कौन्सिल यांनीही सुमारे 27 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 232 कोटी रुपये) कमावले आहेत.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.