वाशी, ता. १५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या बेलापूर विभागाअंतर्गत नेरूळ सेक्टर २८ येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोरील सिडकोच्या भूखंडावरील अनधिकृत झोपड्यांवर पालिकेच्या अतिक्रमण पथकांच्या वतीने कारवाई करीत सिडकोचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला. सिडकोच्या भूखंडावर असणाऱ्या या झोपड्यांना नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे या अनधिकृत झोपड्यांवर अतिक्रमण उपायुक्त भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने कारवाई केली. या मोहिमेसाठी बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे, कनिष्ठ अभियंता आत्माराम काळे, अ विभाग कार्यालयाअंतर्गत बेलापूर विभागातील अधिकारी/कर्मचारी, एक जेसीबी, १५ मजूर, तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते.