-rat१५p६.jpg-
२५N६३८८८
रत्नागिरी ः विमानतळ मार्गावरील भररस्त्यावर आलेल्या अजगराला सर्पमित्राने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
----
सर्पमित्राने आठ फुटी अजगर पकडला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : शहरातील चर्मालय चाररस्ता परिसरात विमानतळ मार्गावरील रस्त्यावर अजस्र अजगर आल्याने गडबड उडाली. तत्काळ सर्पमित्रांना बोलावून अजगराला पकडून जंगलात सोडण्यात आले.
चर्मालय परिसरात बुधवारी (ता. १४) संध्याकाळच्या सुमारास वाहनचालकांना आठ फूट लांब अजगर दिसला. रस्त्यावर सरपटत असलेला हा भलामोठा अजगर पाहून नागरिकांसह वाहनचालकांची गडबड झाली. काही क्षणांतच त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली. काहींनी सर्पमित्रांना याची माहिती दिली. सर्पमित्र सिद्धार्थ सावंत (रा. थिबापॅलेस) काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. रस्त्याच्या कडेला झाडामध्ये अजगर थांबला होता. सावंत यांनी कौशल्याने अजगराला पकडले आणि नैसर्गिक अधिवासात सोडले.