चियर्स! बिअरप्रेमींसाठी मोठी खुशखबर, 200 ची बिअर आता मिळणार अवघ्या 50 रुपयांना?
Marathi May 16, 2025 03:25 PM

बिअरची किंमत खाली येते: भारत- पाकिस्तान (India Pakistan War) यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचे लक्ष या दोन देशांकडे लागले आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होतांना दिसत आहे. तर दुसरीकडे या मंदीच्या सावटाखाली काही जागतिक बाजारपेठेत काही संधी देखील निर्माण होतं असतात. अशाची एक मोठी संधी भारत आणि ब्रिटन (India and Britain) यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या (Free Trade Agreement) रूपाने समोर आली आहे.  परिणामी भारताने ब्रिटनच्या बिअरवरील कर तब्बल 75 टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे 200 रुपये किमतीची बिअर आता अवघ्या 50 रुपयांना मिळण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे बिअरप्रेमींसाठी ही एक मोठी खुशखबर मानली जात आहे.

भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार करार

सध्या सर्वत्र उन्हाच्या प्रखरतेने अंगाची लाहीलाही होत आहे. तर कुठे दमट वातावरणाने मनस्ताप सहन करावा लागतोय. अशा परिस्थितीचा जर तुम्हाला बिअर पिण्याची आवड असेल, आणि त्यातही त्यात मोठी घसरण होणार असेल तर ही आनंददायी बाबचं म्हणावी लागेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बिअरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि अनेकदा आपला आवडती थंड बियर आणि ब्रँड मिळणे कठीण होतं. मात्र  अलिकडे भारताने ब्रिटनच्या बिअरवरील करात तब्बल 75 टक्क्यांनी कपात केल्याने ब्रिटनच्या बियरच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. तर ब्रिटनचे बिअर ब्रँड्स आता भारतात स्वस्त होणार असून 200 रुपये किमतीची बिअर आता अवघ्या 50 रुपयांना  म्हणजेच निम्म्यापेक्षा कमी किमतील मिळू शकणार आहे.

ब्रिटनच्या बिअरवरील करात तब्बल 75 टक्क्यांनी कपात

पुढे आलेल्या माहितीनुसार, ब्रिटनच्या बिअरवर भारताकडून जवळ जवळ 150 टक्क्यांपर्यंतचा कर लागत होता. आता भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे हा कर थेट 75 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. परिणामी, या करारानुसार आयात शुल्कामध्ये मर्यादित सवलत देण्यात आली आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात हा महत्त्वपूर्ण करार 6 मे 2025 रोजी झाला. याच महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ब्रिटनच्या ब्रँडची बिअर भारतात मोठ्या प्रमाणात स्वस्त होणार आहे. त्यामुळे बिअरप्रेमींसाठी ही एक मोठी खुशखबर असून आर्थिक बचत ही होणार आहे. तर दुसरीकडे या मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला आणि व्यापाराला चालना मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.